विशेष प्रतिनिधी
पुणे: काही गोष्टी घडल्या असतील आणि अजित पवार त्यावर बोललं असतील त्यात काही गैर नाही. अजित पवार यांनी ज्या सुचना दिल्या आहेत त्या पोलीस प्रशासनाने पाळल्या पाहिजेत. यात अजित पवार याचं सुद्धा मार्गदर्शन घेऊ, असे सांगत गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी पोलिसांना सुनावले.
पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी कदम यांनी वरिष्ठ पोळी अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
वरिष्ठ पोलीस अधिकारी कमी पडतात असे माझे स्पष्ट मत आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांना जमत नसेल तर त्यांनी स्पष्ट सांगावे. इतर चांगले अधिकारी आहेत त्यांना या शहरात आणून आणि गुन्हेगारीला आळा घालण्याचे काम करू. असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे पोलीस आयुक्तांना काही दिवसांपूर्वी चांगलेच सुनावले. अजित पवार गैर काय बोलले असा सवाल कदम यांनी पत्रकार परिषदेत केला. ते म्हणाले, पदभार स्वीकारला तेव्हापासून पुण्यात आज माझा पहिला दौरा आहे पुणे आयुक्तालयाच्या मी आज आढावा घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या शंभर दिवसाच्या प्लॅनची अमंलबजवणी कशी केली जात आहे याचा आढावा घेतला.
कदम म्हणाले, पुणे पोलीस प्रशासनाला शासनाकडून काही अपेक्षा आहेत. दरवेळेला आम्ही सूचना करतच असतो. परंतु पोलीस कमिशनर असतील त्यांची सर्व टीम असेल त्यांना प्रशासनाकडून, शासनाकडून त्यांना काय अपेक्षा आहेत त्यांना काय हवं आहे यावर सुद्धा विचारणा केली आहे.
पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्था चांगली असल्याचे सांगताना ते म्हणाले पुणे पोलिसांनी 4000 कोटी रुपयांचे ड्रग्ज पकडलं होते. त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन केले. ग्राउंड लेवलवर ड्रग्ज वर लक्ष ठेवले पाहिजे अशा सूचना दिल्या आहेत. पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणी 229 कारवाया केल्या आहे . या कारवाया वाढवा, असे सांगितले आहे. हे काम करताना पोलिसांना फ्री हॅण्ड आम्ही देणार आहोत. ड्रग्ज विक्रीवर कडक कारवाई झाली पाहिजे
अनेक गोष्टी मध्ये सुधारणा करण्याची गरज आहे असे सांगून कदम म्हणाले, शहरात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे यावर देखील अनेक सुधारणा करणार आहोत. सायबर क्राईम मध्ये देखील वाढ झाली आहे याबाबत स्टाफ वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबई मध्ये संयुक्त इमारत सायबर साठी आहे तशीच पुण्यात देखील व्हावी अशी मागणी करण्यात येणार आहे आणि ते पुर्ण देखील करु. पोलीस पोलिस प्रशासन आणि मुख्यमंत्री मधला मी दुवा आहे
-पुण्यात भीतीच वातावरण तयार झालं होतं, पण पोलिसांनी चांगली कामगिरी केली याचे कौतुक करताना कदम म्हणाले, 2023 पेक्षा 24 मध्ये गुन्हेगारी 50 टक्के कमी झाली आहे.2023 च्या तुलनेत क्राईम रेट शहरात कमी झाला आहे.कोयता गँग अशी काही अस्तित्वात नाही. जिथं चुका होतील तिथं करवाई केलीच पाहिजे. बालगुन्हेगारी रोखण्यासाठी पालकांचा आणि मुलांचं कौंसलिंग करू तशा सूचना दिल्या आहेत
वाहतूक विभागासाठी अतिरिक्त आयुक्त पद द्यावे असा प्रस्ताव पाठवला आहे पुणे पोलीस दलात 850 नव्या जागा भरल्या जातील, अशी माहिती त्यांनी दिली.