विशेष प्रतिनिधी
मुंबई : शरद पवार व सुप्रिया सुळे यांनी आता आपल्या घरी बसावे. स्वतःची शेतीवाडी पहावी. कारण, आता त्यांच्या वांग्याला चांगलेच पैसे मिळालेत, असा टोला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांना लगावला आहे.
सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सद्यस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकटेच सक्रीय असल्याचा आरोप केला होता. त्यांच्या या टीकेचा समाचार घेताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्यासह शरद पवारांना घरी बसून शेती करण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, जनतेने त्यांना नाकारले आहे. जनाधार नसलेल्या नेत्यांनी आता घरी बसावे. शरद पवार व सुप्रिया सुळे यांनी घरी बसावे. स्वतःची शेतीबाडी पहावी. त्यांच्या वांग्याला आता चांगलेच पैसे मिळालेत. सुप्रिया सुळे यांनी आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वांग्याच्या शेतीविषयी मार्गदर्शन करावे. कारण वांग्याचे, बटाट्याचे पैसे एवढेच त्यांचे काम आहे.
सुप्रिया सुळे महायुती सरकारवर निशाणा साधताना म्हणाल्या होत्या की, राज्यात महायुती सरकार स्थापन होऊन महिना होत आहे. मंत्र्यांना खातेवाटपही झाले. पण अद्याप अनेक मंत्र्यांनी आपला पदभार स्वीकारला नाही. राज्य मंत्रिमंडळाची काल पहिली बैठकही झाली. त्यात 2 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. पण राज्य सरकारमधील मंत्री नावालाच असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकटेच सरकार चालवतात.
महाराष्ट्र सरकारने आपल्या पाच वर्षांपूर्वीच्या नितीमध्ये बदल करत बांध आणि ‘बैकवाटर’ परिसरांतील दारू विक्री आणि पिण्यावरील बंदी उठवली आहे. २०१९ मध्ये शासकीय आदेशाद्वारे या परिसरांमध्ये दारू विक्री आणि...
Read moreDetails