विशेष प्रतिनिधी
मुंबई : उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय आजपर्यंत स्वत:च्या पैशाने जेवलेले देखील नाहीत. हॉटेलचं बीलही ते देत नाही. बाहेरगावचे तिकीट किंवा अंतर्वस्त्राचे पैसेही ते स्वत: देत नाही, अशी जहरी टीका मत्स्य व्यवसाय व बंदर मंत्री नितेश राणे यांनी केली आहे. ( Uddhav Thackeray and his family have not even eaten with their own money till date, Nitesh Rane’s criticism(
विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना शिंदे गटाच्या ज्येष्ठ नेत्या नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिक दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचे असा आरोप केला होता. गोऱ्हे यांच्या आरोपानंतर ठाकरे गटाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही म्हटले की, महाराष्ट्राने या बाईवर हक्कभंग आणला पाहिजे. निर्लज्ज, विश्वासघातकी बाई. उद्धव ठाकरेंनी गोऱ्हेंना काय द्यायचे कमी केले होते. संजय राऊत यांच्या टीकेवर आता मंत्री नितेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
राणे म्हणाले, उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाबाबत आजपर्यंत आलेल्या अनुभवाने मी सांगतो, असे म्हणत नितेश राणे यांनी आणखी एक दावा केला. त्यांनी म्हटले की, आमचे वडील 39 वर्ष शिवसेनेत होते. उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय आजपर्यंत स्वत:च्या पैशाने जेवलेले देखील नाहीत. एवढंच नाही तर हॉटेलचं बीलही ते देत नाही. घरातला एसीही व्हिडीओकॉनचा लावला होता. त्यामुळेच राजकुमार धूत यांना खासदारकी दिली होती. बाहेरगावचे तिकीट किंवा अंतर्वस्त्राचे पैसेही ते स्वत: देत नाही. तुम्हाला मी दुकानाचं नावही देऊ शकतो, असा दावा त्यांनी केला.
संजय राऊत यांना आव्हान देत राहणे म्हणाले की, तुमच्या मालकाचे वस्त्रहरण करायचे असेल तर एक खुली पत्रकार परिषद घ्या आणि माझ्या बाजूला बसा. आम्ही तुम्हाला उद्धव ठाकरेंच्या गाड्या, कपडे आणि जेवण कुठून येते याबाबत माहिती देऊ. आताही उद्धव ठाकरेंच्या घराची लाँड्री ही लीला हॉटेलमधून केली जाते. त्यावर यादव हे नाव दिलं जातं. त्याची मी रिसीट दाखवू शकतो. आताही त्यांच्या घरात जे सँडविच जातात ते ट्रायडेंट हॉटेलमधून जातात. त्यामुळे संजय राऊतांना मी सांगेन की मला तोंड उघडायला लावू नका. नीलम गोऱ्हे जे काही बोलल्या आहेत, ते योग्य आहे. जर अजून तुमच्या मालकाचं वस्त्रहरण करायचे असेल तर बोलत राहा. आम्ही अजून माहिती देत राहू,
संजय राऊतांवर निशाणा साधताना नितेश राणे म्हणाले की, राऊतांचे महिलांबद्दल काय विचार आहेत ते कधीतरी डॉ. स्वप्ना पाटकर यांना विचारा. कारण पूर्ण महाराष्ट्राने त्यांचे विचार ऐकले आहेत. खरं तर संजय राऊतांना नीलम गोऱ्हेंचे वक्तव्य दुखणारचं. कारण उद्धव ठाकरे जर मर्सिडिज घेत असतील, तर संजय राऊत हे स्वत: मारुती मागतात. त्यामुळे त्यांना नीलम गोऱ्हेंचे वक्तव्य झोंबणारचं. मालकाला मर्सिडिज द्या आणि नोकराला मारुती कार द्या. ते त्याच शाळेचे विद्यार्थी आहेत, त्यामुळे त्यांना हे झोंबणारचं.