केस गळणे खूप मोठी समस्या झाली आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे आपली जीवनशैली आहे. खाण्याच्या वाईट सवयीमुके केस लगेच गळू लागतात. तसेच केसांना योग्य पोषण न मिळाल्यामुळे ते लगेच गळू लागतात.
केस गळण्याची कारणे म्हणजे
तणाव
हार्मोनलमध्ये बदल
मेडिकल कंडिशन
औषध
केस गळती कशी थांबवायची?
पोषक आहार घ्या व्यायाम करा चांगली झोप घ्या तणाव कमी घ्या केसांची चांगली मालिश करा
त्यासाठी केसांना योग्य व्हिटॅमिन्सची देखील गरज असते. या व्हिटॅमिन्समुळे आपले केस मजबूत आणि निरोगी राहतात.
आता ही व्हिटॅमिन्स कोणती हे देखील आपण पाहू.
■ व्हिटॅमिन डी
आपले केस मजबूत आणि निरोगी राहण्यासाठी केसांच्या वाढीसाठी व्हिटॅमिन डी खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे तुम्ही व्हिटॅमिन डीने भरपूर असलेल्या काही पदार्थाची निवड करू शकता किंवा काही वेळ उन्हात बसू शकता. याशिवाय मासे, अंडी, दूध, दही या पदार्थाची निवड करू शकता.
बायोटिन व्हिटॅमिन बी
बायोटिनला केसांचे जीवनसत्त्वदेखील म्हणतात. हे केस मजबूत करते आणि केस गळणे थांबवते. अंडी, काजू, बिया आणि कडधान्ये हे बायोटिनचे चांगले स्रोत आहेत.
■ व्हिटॅमिन-ई
व्हिटॅमिन ई एक अँटीऑक्सिडंट आहे, जे केसांना हानीपासून वाचवते आणि टाळू निरोगी ठेवते. बदाम, अॅव्होकॅडो आणि सूर्यफुलाच्या बिया व्हिटॅमिन ईचे चांगले स्त्रोत आहेत.■ आयर्न
शरीरात आयर्नची कमी असेल तर केस लगेच तुटू लागतात. तसेच तुम्ही पालक, बीटरूट या पदार्थांचे सेवन करू शकता. आहाराद्वारे ही जीवनसत्त्वे घेण्याव्यतिरिक्त तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर व्हिटॅमिन सप्लिमेंट्सदेखील घेऊ शकता.
■ व्हिटॅमिन सी
व्हिटॅमिन सी हे केस मजबूत करण्यासाठी आवश्यक आहे. संत्री, लिंबू आणि स्ट्रॉबेरी हे व्हिटॅमिन सीचे चांगले स्रोत आहेत.