विशेष प्रतिनिधी
बीड : मनोज जरांगेच्या डोक्यात फरक पडला आहे. तो वैफल्यग्रस्त झाला आहे.त्याच्या बोलण्याकडे कोणी लक्ष देऊ नका अशा शब्दात मंत्री आशिष जयस्वाल यांनी मनोज जरांगेवर जहरी टीका केली आहे.
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील संतोष देशमुख प्रकरणावरुन आक्रमक झाले आहे. त्यांनी संतोष देशमुख यांचे कुटुंबिय आणि त्यांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्या केसाला जरी धक्का लागला तर धनंजय मुंडे यांना रस्त्यावरही फिरू देणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. त्यांना जयस्वाल यांनी जोरदार उत्तर दिले आहे. त्यांनी मनोज जरांगेवर जहरी टीका केली आहे. मनोज जरांगे वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यांच्या डोक्यात फरक पडला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
जयस्वाल म्हणाले, संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरु आहे. कायदा आपले काम करणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच स्पष्टीकरण दिले आहे,
संतोष देशमुख खून प्रकरणातील सर्व आरोपींची नार्को टेस्ट केली पाहिजे. खंडणीच्या आणि हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी दोघांची नार्को टेस्ट झाली पाहिजे. सरकारने यात अजिबात हयगय करु नये. . कारण यामध्ये मोठं रॅकेट आहे” असा दावा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक झाल्यानंतर जरांगे पाटील यांनी ही मागणी केली. ते म्हणाले, “पुण्यातून सगळ्यांना पकडलं जातय याचा अर्थ सरकार आणि सरकारमधील मंत्र्याच प्रचंड राजकीय पाठबळ आहे. यांना कोण संभाळतय, त्यांना सुद्धा सरकारने अटक करावी. आरोपी पुण्यात सापडतायत, हा डावच आहे. सरकारमधले मंत्री याला खतपाणी घालतायत. इतके दिवस लपून राहतात. सामूहिक कट शिजत आहे. सरकारमधले मंत्री-आमदार यांना शिकवतात. बीडच नाव बदनाम केलं, आता पुण्याच नाव खराब करताय. हे आरोपींना शिकवतायत.