पुणे : मित्रासोबत सेनापती बापट रस्त्यावरून हनुमान टेकडीवर फिरण्यासाठी गेलेल्या महाविद्यालयीन तरुणीला कोयत्याच्या धाकाने लुटणाऱ्या तीन गुंडांना पोलिसांनी जेरबंद केले.
चोरट्याने हनुमान टेकडीवर फिरण्यासाठी गेलेल्या महाविद्यालयीन तरुणीची एक लाख रुपयांची सोनसाखळी चोरून नेली हनुमान टेकडी परिसरात अलीकडल्या काळात घडलेला हा तिसरा प्रकार आहे. याप्रकरणी तरुणीने डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना 4 जानेवारी ला दुपारी दोनच्या सुमारास घडली तरुणी मित्रासोबत हनुमान टेकडी परिसरात फिरायला गेली होती त्यावेळी चोरट्याने दोघांना धमकावून शिवीगाळ केली त्यानंतर एकाने कोयत्याचा धाक दाखवून तरुणीला मारहाण केली व तिच्या गळ्यातील एक लाख रुपये किमतीचे सोनसाखळी चोरून नेल्याची घटना घडली होती यावर आता पुणे पोलिसांनी तीन आरोपींना पकडत साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.