विशेष प्रतिनिधी
पुणे : प्रेमप्रकरणातून मुलाच्या वडिलांचे घरातून अपहरण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार हडपसर भागात घडली आहे. अपहरण नाटयानंतर हडपसर पोलिसांनी १२ तासात अपहृत वडिलांची सुखरूप सुटका करत वाघोली परिसरातील तिघांना केली आहे. एकजण फरार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. ( Abduction of boy’s father as girl disappears from love affair)
अभिजीत भोसले (वय २२), रणजीत डिकोळे (वय २१) व मारूती गायकवाड (वय २३) अशी पकडलेल्या तिघांची नावे आहेत. त्यांचा,
साथीदार सागर खुरंगळे हा फरार असून, त्याचा शोध घेतला जात आहे.
अपहरण झालेल्यांच्यामुलाचे व मुलीचे प्रमेसंबंध होते. परंतु, मुलीच्या कुटूंबियांचा त्यांच्या प्रेमास विरोध होता. त्यातच मुलगी ३ फेब्रुवारी रोजी गायब झाल्याने कुटूंबियांना संबंधित मुलावर संशय आला. त्यामुळे हे कुटूंब मुलाच्या घरी आले. त्यांच्यात वादविवाद झाले. दोन्ही कुटूंबात वाद झाल्यानंतर मुलीचे कुटूंबिय तेथून निघून गेले.
रात्री अकराच्या सुमारास पुन्हा मुलीचा एक नातेवाईक व त्याचे इतर तीन साथीदार मुलाच्या घरी आले. त्यांनी जबरदस्तीने मुलाच्या वडिलांना घरातून बाहेर आणले. त्यांना दुचाकीवर बसवत त्यांना घेऊन गेले. अपहरण नाटयानंतर मुलाच्या आईने पोलीस नियत्रंण कक्षास अपहरणाची माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांनी अपहरण कर्त्यांचा शोध सुरू केला. वेगवेगळी पथके तयारकरून वाघोली, केसनंद तसेच हडपसर परिसर पिंजून काढला. पण, त्यांचा शोध लागला नाही. बातमीदाराकडून माहिती मिळाली की, अपहरणकर्ते हे अपर्हत व्यक्तीला घेऊन वाडेबोल्हाई व केसनंद परिसरात फिरत आहेत. शोध घेत असताना ते वारंवार ठावाठिकाणा बदलत होते. नंतर ते सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे जात असल्याचे समजले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पाटस टोलनाका येथे पकडले. त्यांच्या तावडीतून अपहरण व्यक्तीची सुखरूप सुटका करून तिघांना ताब्यात घेतले.