A casteist person like Jarange should not be allowed in Beed Morcha, Navnath Waghmare’s criticism
बीड : बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात न्याय मागण्यासाठी 28 तारखेला मोर्चा निघणार आहे. या मोर्चात एक नागरिक म्हणून सहभागी होणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केले आहे. मात्र, जरांगे सारख्या जातीवादी माणसाला प्रवेश देऊ नये , असे ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी म्हटले आहे.
वाघमारे म्हणाले, बीडच्या मोर्चाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न सुरु आहे. धनंजय मुंडेंना पालकमंत्री पद मिळू नये म्हणून मोर्चाचे आयोजन केले आहे. ओबीसीच्या नेत्यांना बदनाम करण्याचे काम सुरु आहे.मस्साजोग प्रकरणात राजकीय लोकं याचा फायदा घेण्याचं काम करत आहेत. जरांगे सारख्या जातीवादी माणसाला यात प्रवेश देऊ नये. संतोष देखमुखांना न्याय देण्यासाठी सकल बहुजनांचा मोर्चा झाला पाहिजे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या मोर्चात कोणीही राजकारण आणू नये असे माझे मत आहे. एका लेकीने आपल्या वडिलांसाठी हाक दिली. कुणाला आमंत्रण असो वा नसो कोणत्याही पक्षाच्या नेत्याने आमंत्रण नाही असं म्हणून नये. लेकीने हाक मारली म्हणून सहभागी व्हायचं असल्याचं पाटील यांनी मस्साजोग गावातून म्हटले आहे.