[10:35 am, 6/1/2025] Harshu: विशेष प्रतिनिधी
शिर्डी : शिर्डीतील साईबाबा संस्थानने मोफत जेवण बंद करावं. फुकट जेवणामुळे महाराष्ट्रातील भिकारी येथे गोळा झाले आहेत. हे पैसे मुलांच्या भवितव्यासाठी, शिक्षणासाठी खर्च करावे, अशी मागणी माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीवर टीकेची झोड उठली आहे.
विखे पाटील यांनी शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या मोफत जेवणावर यांनी आक्षेप घेतला आहे. यामुळे शिर्डीत भिकाऱ्यांची संख्या वाढली आहे. हा निधी मुलांच्या शिक्षणासाठी वापरावा. प्रसंगी यासाठी आंदोलन करण्याची वेळ आली तरी मागे हटणार नाही.
विविध राजकीय पक्षांनी यावरून विखे पाटील यांना लक्ष्य केले आहे. शिर्डीतील साईबाबा संस्थान भक्तांच्या देणगीतून दररोज पन्नास हजारापेक्षा जास्त लोकांना मोफत भोजन देत आहे. देणगीदार साई भक्तांनी 365 दिवस अन्नदानासाठी बुकिंग करून ठेवलं असून याचा आर्थिक बोजा साईबाबा संस्थानवर पडत नाही. साई संस्थानकडे साडेचारशे कोटीहून अधिक निधी अन्नदानासाठी पडून आहे. तो निधी साई संस्थांनला अन्य कुठेही वापरता येत नाही. अनावश्यक लोकांनी येथे येऊन जेवण करणे आणि गुन्हेगारी वाढणे या दृष्टीने बघू नये. महाप्रसाद म्हणून भाविक साई प्रसादालयात भोजन करत असतात, असं साई संस्थानचे माजी विश्वस्त आणि काँग्रेसचे पदाधिकारी एकनाथ गोंदकर यांनी म्हटलं आहे.
असं बोलणे साई भक्तांचा अपमान आहे अशी प्रतिक्रिया सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, साई संस्थानला जगभरात लोकं येतात. श्रद्धेपोटी कोट्यावधींची निधी देतात. अन्न दान करणे हे योग्य आहे, त्याचा गैर अर्थ घेऊ नये.
विखेच्या संस्थेतून जेवण दिले जात नाही जनतेच्या पैशातून साईबाबा संस्थानचे जेवण दिलं जातं. विखेंक्या खिशातून दिलं जात नाही भुकेलेल्याला अन्न दिले पाहिजे, अशी टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले.
विखे पाटील कुठल्या संदर्भाने बोलले हे आम्हाला माहीत नाही. मात्र कोट्यवधी रुपयांचा निधी देशभरातील देणगीदार साईभक्त साई संस्थानला देतात. त्यातून अन्नदान होत असतं, याच्या माध्यमातून देशभरातील भाविक अन्नप्रसादाचा लाभ घेतात. ज्या साई भक्तांना ऐच्छिक रक्कम द्यायची ते देऊ शकतात. विकास कामांसाठी साईबाबा संस्थानकडे करोडो रुपयांचा निधी आहे ते त्यातून विकास करू शकतात. त्यामुळे हे सगळं करण्याची आवश्यकता नसल्याचं राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी संग्राम कोते यांनी म्हटलं आहे.
[10:35 am, 6/1/2025] Harshu: