विशेष प्रतिनिधी
पुणे : लाडकी बहिण योजनेसाठी महिला बालविकास विभागाला इतर कोणत्याही खात्याचा निधी वळविण्यात आलेला नाही. नागपूर येथे झालेल्या अधिवेशनादरम्यान सव्वाशे कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
योजनेसाठी लागणार्या निधीवरून विरोधक सत्ताधारी पक्षावर आरोप करीत आहेत. या योजनेमुळे शिक्षकांचा पगार होण्यास उशीर होणार असल्याचा आरोप होत आहे. या प्रश्नावर आदिती तटकरे म्हणाल्या की, तुम्हाला चुकीची माहिती मिळाली आहे. आचारसंहितेच्या कालावधीत निधीला स्थगिती देण्यात आली होती. त्या निधीतून हप्ता दिला जात आहे. त्यामुळे इतर कोणत्याही विभागाच्या निधीशी संबध नाही. लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना पहिला हप्ता हा २४ डिसेंबरपासून देण्यास सुरुवात केली असून पुढील तीन ते चार दिवसांत सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात पहिला हप्ता पोहोच होईल.
राज्यातील महिला अत्याचाराच्या घटनांवर तटकरे म्हणाल्या, केंद्र सरकारने जे कायदे आणले आहेत त्याच्यानुसार आता कडक कारवाई होईल. मुख्यमंत्री यात लक्ष घालतं आहे.
बीड घटने बाबत निषेध व्यक्त केला आहे, राज्याचे मुख्यमंत्र्यांनी या बाबत जी भूमिका अधिवेशनात मांडली आहे. तीच आमच्या सर्वाची भूमिका आहे. जर कोणी यावरून राजकारण करत असेल तर दुर्दैवी आहे, असे त्या म्हणाल्या.
रायगड पालकमंत्री पदाबाबत त्या म्हणाल्या, सर्वाची इच्छा असते पालकमंत्री व्हावं. यात गैर नाही. याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील. आमचे सहकारी भरत गोगावले इच्छुक आहेत, याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होतील.
महाराष्ट्र सरकारने आपल्या पाच वर्षांपूर्वीच्या नितीमध्ये बदल करत बांध आणि ‘बैकवाटर’ परिसरांतील दारू विक्री आणि पिण्यावरील बंदी उठवली आहे. २०१९ मध्ये शासकीय आदेशाद्वारे या परिसरांमध्ये दारू विक्री आणि...
Read moreDetails