विशेष प्रतिनिधी
बीड : खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्या वयोवृद्ध आईने परळी शहर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
पारूबाई बाबुराव कराड असे त्यांचे नाव असून सकाळपासून त्यांनी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. एकीकडे आज वाल्मिक कराड ची सीआयडी कोठडी संपणार असून त्याला केज न्यायालयात हजर केले जाणार आहे. अशातच कराडच्या आईने हे आंदोलन सुरू केले आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच मुख्य मास्टरमाइंड असल्याचा आरोप होतोय. सध्या तो 2 कोटी रुपये खंडणी मागितल्याच्या प्रकरणात तुरुंगात आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात रोज नवनीन घडामोडी घडत आहेत. काल संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं होतं. आज खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या वाल्मिक कराडची आई पारुबाई कराड परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलनाला बसल्या आहेत. आपल्या मुलाला सोडावं. तो निर्दोष आहे असं पारुबाई कराड यांचं म्हणणं आहे. त्या 75 वर्षांच्या आहेत. खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराडवर अन्याय झालाय असं पारुबाई कराड यांचं म्हणणं आहे. ‘माझ्या मुलाला न्याया द्या’ असं म्हणत त्या परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलनाला बसल्या आहेत.
माझ्या लेकाने काही केलं नाही. माझ्या लेकासाठी मी जीव द्यायला तयार आहे. इथून उठणार नाही” असं पारुबाई कराड म्हणाल्या आहेत. ‘हे सर्व खोटं आहे’. कोण करतय हे सर्व? त्यावर ‘काय माहित’ असं त्यांनी उत्तर दिलं. जाणीवपूर्वक अडकवले जातय का? या प्रश्नावर ‘आता काय माहित’ असं उत्तर त्यांनी दिलं.