विशेष प्रतिनिधी
पुणे : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप होत असलेला वाल्मिक कराड याला पुणे येथून ताब्यात घेण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र अद्याप अटक दाखविण्यात आलेली नाही. सीआयडीच्या पथकाने ही कारवाई केल्याचे बोलले जात आहे.
वाल्मिक कराड याला पुण्यात ताब्यात घेण्यात आल्याची चर्चा कालपासून सुरू आहे. मात्र अद्याप त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
वाल्मिक कराड याच्यासह फरार आरोपींची संपत्ती देखील जप्त करण्यात आली आहे. तसेच वाल्मिक कराड याच्या नातेवाईकांची देखील बँक खाती गोठवण्यात आली आहेत. वाल्मिक कराड याचेही बँक खाते गोठवण्यात आले आहे.
देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे अद्याप सापडले नाहीत. त्यांची हत्या झाल्याचा संशय सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी व्यक्त केला आहे.
जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले, विष्णू चाटे या चौघांना पोलिसांनी आधीच अटक केली आहे. विरोधकांसह सत्ताधारी आमदारांनी देखील वाल्मिक कराडवर या हत्या प्रकरणात संशय व्यक्त केला आहे. असं असलं तरी पोलिसांनी वाल्मिक कराडवर फक्त खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळेv