पुणे: येरवडा भागातील लक्ष्मीनगर येथे रिक्षा आणि दुचाकींच्या काचा फोडून दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीची पोलिसांनी घटनास्थळावरून धिंड काढली. ( The accused, who created terror by breaking the windows of rickshaws and two-wheelers at Lakshminagar in Yerawada area, was arrested by the police from the spot.)
सयाजी संभाजी डोलारे (वय २३, रा. लक्ष्मी नगर, येरवडा) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. शनिवार (६ फेब्रुवारी) च्या रात्री दोन वाजता आरोपी डोलारे याने तोडफोड केली होती.
अबूबकर रजाक पिरजाते (वय ३१, रा. लक्ष्मीननगर, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादी पिरजाते व इतरांच्या रिक्षा पार्क केलेल्या असताना ६ फेब्रुवारीच्या रात्री २ वाजता सयाजी डोलारे याने परिसरात मोठमोठ्याने आरडाओरडा करीत शिवीगाळ करून दहशत माजविली. त्याच्याकडील धारदार हत्याराने परिसरातील १२ रिक्षांच्या काचा फोडल्या. तसेच २ दुचाकीवर वार करुन नुकसान केले. एक जेसीबीची काच फोडली. फिर्यादी यांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांच्यावर वार करुन जखमी केले होते.
या घटनेनंतर सयाजी डोलारे हा फरार झाला होता. येरवडा पोलिसांनी त्याला शनिवारी (१५ फेब्रुवारी) अटक केली. त्यानंतर १६ फेब्रुवारीला पोलिसांनी आरोपीसह घटनास्थळी जाऊन घटनास्थळाची पडताळणी केली. जेथे गाड्यांच्या काचा फोडून आरोपीने दहशत माजविली होती त्या लक्ष्मीनगर परिसरात पोलिसांनी त्याची धिंड काढली. आरोपीचे हात दोरखंडाने बांधून त्याला फिरविण्यात आले. पुढील तपास येरवडा पोलीस करत आहेत.