विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना आज दिल्लीतील लोकांपेक्षा जास्त पश्चाताप होत असेल. केजरीवालांनी अण्णांसारख्या संत माणसाला पुढे आणून सत्ता हस्तगत केली. या केजरीवालांनी इतका भ्रष्टाचार केला की त्यांनी देशातील सर्व सरकारांचे रेकॉर्ड मोडले, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला.
दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांच्या प्रचारात ते बोलत होते. शाह म्हणाले की केजरीवाल दिल्लीला भ्रष्टाचार मुक्त प्रदेश बनवणार होते. परंतु त्यांच्या सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांपासून ते आमदारांपर्यंत अनेकांना तुरुंगवास भोगावा लागला. अमित शाह म्हणाले की अण्णा हजारे सुद्धा विचार करीत असतील की मी असा कुठला प्रोडॅक्ट बनवला जो इतका भ्रष्ट आहे. अमित शाह म्हणाले की भाजपचे सरकार सत्तेत आल्यावर कुठल्याही प्रकारच्या जनकल्याण योजना बंद होणार नाही. या दरम्यान त्यांनी दिल्ली सरकारच्या कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांच्यावर ताशेरे ओढले.
अमित शाह जनतेशी संवाद साधताना म्हणाले की दिल्लीचे नेते आतापर्यंत २५०० हून अधिक झोपड्यांमध्ये जाऊन आले. त्यावेळी त्यांच्या सर्वेक्षणात असे लक्ष्यात आले की देशातील सर्वात प्रदूषीत शहर म्हणून आता दिल्लीकडे बघितले जातं.आहे.
भारत निवडणूक आयोगाने (Election Commission of India) बिहार विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितले की, निवडणुका दोन...
Read moreDetails