विशेष प्रतिनिधी
नागपूर : आत्ता अहिल्यानगरवरुन रेल्वे दौंडला आणि तेथून पुण्याला जाते. मी नगरवरुन थेट पुण्यासाठी रेल्वे असावी असे मी सूचवले आहे. संभाजी नगर ते अहिल्यानगर ते पुणे हा नवीन एक्सप्रेस वे करत आहोत.. त्या बाजूने रेल्वे मार्ग केल्यास नागपूर ते पुणे अंतर शंभर अंतर कमी होऊ शकते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडण्यासाठी घोषणा करण्यात आलेली नागपूर – पुणे वंदे भारत आजपासून सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवला. पण नागपूर रेल्वे स्थानकावर मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते. या उद्धाटनानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. तर ज्या प्रवासाला 16 ते 17 तासांचा अवधी लागत होता, त्याला आता 12 तास लागणार असल्याने यामुळे पुणे – नागपूर कनेक्टिव्हीटी वाढणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळीसांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले, आज आम्हा सर्वांकरिता आनंदाची गोष्ट आहे. मी स्वतः रेल्वे मंत्र्यांना ही ट्रेन सुरू करण्यात यावी, अशी विनंती केली होती. नागपूर पुणे खूप ट्रॅफिक आहे. या मार्गावर खासगी बसेसमधून प्रवास करायचा असेल तर त्यांचे दर हे 5-5 हजारांच्या वर जातात. त्यामुळे लोकांना खूप अडचणीचा सामना करावा लागतो आणि म्हणून एक वंदे भारत ट्रेन सुरू केली पाहिजे, अशी मागणी मी केली होती. त्यानंतर यावर रेल्वे मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. आज प्रत्यक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर – पुणे वंदे भारतची सुरुवात झाली आहे. देशामध्ये नागपूर – पुणे हा मार्ग सर्वात लांब पल्ल्याचा मार्ग आहे. यापूर्वी 881 किमी इतक्या लांब प्रवासासाठी कोणतीच वंदे भारत ट्रेन सुरू झाली नव्हती.
अतिशय वेगाने आणि अतिशय चांगल्या सोयीने युक्त अशा प्रकारे नागपूर आणि पुण्याच्या प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. 16 ते 17 तास या मार्गिकेवर प्रवास करण्यास लागतात, मात्र केवळ 12 तासांमध्ये हा प्रवास पूर्ण होणार आहे. अतिशय आरामदायी हा प्रवास होणार आहे. त्यामुळे या ट्रेनकरिता पंतप्रधान मोदी आणि रेल्वेमंत्र्यांचे आभार मानतो, असे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटले. त्याशिवाय, रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून नगरवरून ट्रेन दौंडला जाते आणि तिथून ती पुण्याला जाते. यामुळे 100 ते 125 किमी प्रवास वाढतो. त्यामुळे आता नगरवरून थेट पुण्यापर्यंत मार्गिका केली तर यामुळे वेळ वाचेल आणि अंतर कमी होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.