त्या मुलांच्या वडीलांचे बऱ्याच वर्षांपूर्वी निधन झाले आहे . मात्र त्यानंतर आईच्या या नात्यामुळे वडिलांच्या स्मृतीचा अपमान होतोय, अशी त्या मुलांची धारणा होती. रतनजी ठाकूर असे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते व्यवसायाने गवंडी होते. त्याचे गावातील एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते. या कारणावरून त्या महिलेची मुले संजय आणि जयेश ठाकूर हे रतनजीवर चांगलेच चिडले होते.
त्या दोघांनी यापूर्वीही रतनजींना आईपासून दूर राहण्याची धमकी दिली होती, पण तरीही रतनजींसोबत आईचं प्रेमसंबंध सुरूच होते. या वादामुळे जातपंचायतीही बोलावण्यात आली, मात्र त्यातही तोडगा निघाला नव्हता असे पोलिसांनी सांगितले.