विशेष प्रतिनिधी
पुणे ; बालेवाडी येथील सनराईज फॉर यू फॉरेक्स प्रा. लि . हे करन्सी एक्सचेंजचे दुकान शटर तोडून फोडून चोरटयांनी डॉलर, थाई बाथ आणि दिराम अशा विविध देशांच्या चालनासह २५ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. बुधवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. (Currency exchange shop broken into currency worth Rs 25 lakh stolen including dollarsThai baht dirhams)
चोरट्याने दुकानाचे लोखंडी शटर तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील लॉकर उचकटून त्यामधील २,५७,४२० रुपये रोख आणि अंदाजे २० ते २२ लाख रुपये किमतीचे डॉलर, थाई बाथ आणि दिराम असे विविध देशांचे चलन चोरून नेले. याप्रकरणी रोहित दिलीप मालुसरे (वय ४०, रा. सोमवार पेठ, पुणे , व्यवसाय करन्सी एक्सचेंज ऑपरेटर) यांनी तक्रार दिली आहे.
घटनेची माहिती मिळताच बाणेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. दुकान परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून चोरट्याच्या शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेने बालेवाडी परिसरात दहशत निर्माण झाली असून व्यावसायिकांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने चिंता व्यक्त केली जात आहे.