विशेष प्रतिनिधी
अमरावती : राज्याच्या परिवर्तनामध्ये उद्धव ठाकरेंनी तिळगूळ खावे आणि गोड गोड बोलावे अशी विनंती करत आमदार रवी राणा यांनी पुढील मकरसंक्रांतीपर्यंत उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दिसतील, असे म्हटले आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना रवी राणा आणि त्यांच्या पत्नी माजी खासदार नवनीत राणा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी मोठा संघर्ष केला होता. ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीसमोर राणा दांपत्याने हनुमान चालीसा पठण करून आंदोलन केले होते. त्यामुळे त्यांना अटकही झाली होती. त्यांनी उध्दव ठाकरे यांच्याविषयी हे वक्तव्य केल्याने भुवया उंचावल्या आहेत. राज्यात सरकार स्थापन झाल्यापासून भाजप आणि ठाकरे गटाची जवळीक वाढत असल्याचे दिसून येत आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनादरम्यान उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तर आदित्य ठाकरे हे देखील आतापर्यंत तीन वेळा देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी गेले होते. शिवाय ठाकरे गटाच्या ‘सामना’मधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करण्यात आले. तसेच उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, असे विधान फडणवीसांनी केले होते. या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया देताना रवी राण यांनी उपरोक्त मोठा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
पत्रकारांशी बोलताना राणा म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांना भेटून उद्धव ठाकरे एक पाऊल पुढे आले आहेत. पुढच्या मकरसंक्रांतीपर्यंत उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांसोबत दिसतील. मोदींचे नेतृत्व उद्धव ठाकरेंनी खुल्या मनाने स्वीकारले तर नक्कीच हे होईल. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात महाराष्ट्र पुढे जाणार आहे. त्यांच्यात नेतृत्वात आगामी महापालिका निवडणुकीत भाजपा- युवा स्वाभिमान पक्ष रिंगणात उतरेल. कुठल्याही निवडणुकीत आम्ही एकत्रित राहू .
राणा म्हणाले, राजकारणात लोकांनी दिलेला निर्णय स्वीकारला पाहिजे. अचलपूरमधून प्रवीण तायडे सक्षम आमदार निवडले आहे. प्रवीण तायडे मतदारसंघात जी काही विकासकामे करतील त्यांना बच्चू कडू यांनी पाठिंबा दिला पाहिजे. विकासकामे करतील त्यांना बच्चू कडू यांनी पाठिंबा दिला पाहिजे. लोकशाहीत पराभव झाल्यानंतर तो स्वीकारून सगळ्यांनी अमरावतीच्या विकासासाठी एकत्र आले पाहिजे. विरोधकांनी तिळगूळ खावे आणि गोड गोड बोलावे, विकासासाठी एकत्र यावे, असे आवाहनही रवी राणा यांनी स्थानिक राजकीय नेत्यांना केले आहे
महाराष्ट्र सरकारने आपल्या पाच वर्षांपूर्वीच्या नितीमध्ये बदल करत बांध आणि ‘बैकवाटर’ परिसरांतील दारू विक्री आणि पिण्यावरील बंदी उठवली आहे. २०१९ मध्ये शासकीय आदेशाद्वारे या परिसरांमध्ये दारू विक्री आणि...
Read moreDetails