विशेष प्रतिनिधी
मुंबई: महाविकास आघाडीत बिघाडी होणारच होती. कारण ते स्वार्थासाठी एकत्र आले होते. लोकसभेला लोकांची दिशाभूल करुन मतं घेतली. मतं मिळाल्यानंतर ज्यांनी मतदान केले त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसला असा आरोप उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी केला.
महाविकास आघाडीतील फुटीबाबत ते म्हणाले, स्वार्थासाठी एकत्र आलेले फुटणे स्वाभाविक आहे. मी मुख्यमंत्री असताना मला रोज शिव्या दिल्या जात होत्या. माझ्यावर उठसूट आरोपही केले जात होते. मलाच नव्हे तर तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही खालच्या थरावर आरोप केले. फडणवीस यांना तुरंगात टाकण्याचे प्रयत्न केले. तू राहील मी राही अशी भाषा केली. अजून काय काय बोलले मी ते सांगू शकत नाही. पण आता पाहा काय बदल झाला? काय जादू झाली? सरडे रंग बदलतात. पण एवढे फास्ट वेगाने रंग बदलणारे सरडे मी पाहिले नाहीत, असा हल्लाबोल शिंदे यांनी केला.
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याला त्यांचे विचार मानणारे येतील. त्यांचे विचार सोडणाऱ्यांचा संबंध नाही, अशा प्रकारचं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. ठाकरेंच्या या विधानाचाही त्यांनी समाचार घेतला. ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांना कार्यक्रमाला बोलावणार नाही, असं ते म्हणाले. अरे कार्यक्रम कुणाचा आहे? बाळासाहेबांचं स्मारक कोण बांधतोय? सरकार बांधतंय. बाळासाहेबांचं स्मारक हे कुणाच्या मालकीचं नाही. त्यामुळे त्यांना हे बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी जोरदार टीकाही त्यांनी केली.
महाराष्ट्र सरकारने आपल्या पाच वर्षांपूर्वीच्या नितीमध्ये बदल करत बांध आणि ‘बैकवाटर’ परिसरांतील दारू विक्री आणि पिण्यावरील बंदी उठवली आहे. २०१९ मध्ये शासकीय आदेशाद्वारे या परिसरांमध्ये दारू विक्री आणि...
Read moreDetails