विशेष प्रतिनिधी
बीड : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दोन दिवसांपूर्वी संतोष देशमुख खून प्रकरणातील तिघांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला होता . त्यामुळे राज्यभर खळबळ माजली होती. मात्र हा मेसेज त्यांना एकाने दारू पिऊन केला होता.
बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत, यांनीच नवनीत कावत, यावर खुलासा केला आहे. अंजली दमानिया यांना केलेला मेसेज दारू पिलेल्या व्यक्तीने केला होता, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन फरार आरोपींची हत्या झाल्याचा खळबळजनक दावा सामजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता. या तीन फरार आरोपींची हत्या झाल्याचा फोन आला होता असे दमानिया म्हणाल्या होत्या
एका व्यक्तीने काल रात्री फोन केले आणि नंतर वॉईस मेसेज टाकला.ज्यात त्याने असं म्हटले आहे की तिन्ही आरोपी सापडणार नाहीत .कारण तिघांची हत्या झाली आहे. हे खरं आहे की खोटं हे मला माहित नाही. याबाबत एसपींकडे माहिती दिली आहे. मात्र आता फोन नव्हे तर मेसेज आला होता आणि तोही मद्यपीचा होता हे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, ज्यांना शस्त्र परवान्याची गरज नाही त्यांचे शस्त्र परवाने रद्द केली जातील असेही नवनीत कावत यांनी सांगितले आहे.सगळ्या शस्त्र परवानाची माहिती घेणे सुरू आहे. ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे .या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा झाली आहे..ज्यांना शस्त्र परवाना गरज नाही त्यांचे शस्त्र परवाने रद्द केली जातील. शस्त्र परवान्याच्या सर्व फाईलचे अवलोकन केलं जाणार आहे . ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांचा लायसन्स रद्द करण्याचा प्रस्ताव दाखल केला आहे असेही त्यांनी सांगितले.