विशेष प्रतिनिधी
देवणी :तालुक्यातील नागतिर्थवाडी येथील शेत शिवारातील विहीरीतील सोलार पंपाच्या वापरातील दोन मोटारी चोरीप्रकरणी अज्ञात विरूद्ध देवणी पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील नागतिर्थवाडी येथील शेत शिवारातील विहीरीत वापारात असलेली शासनाने मंजूर केलेली सोलारपंपाची जुनी सुमारे १५ हजार रुपयांची मारूती गूणाले यांच्या दोन्ही विहीरीतील शासनाने मंजूर केलेली सोलार पंपाची मोटार सहा हजार रुपये किमतीची मोटार अशा एकुण ३६ हजार रूपयांचे पाण्याचे मोटारी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले.
भागवत गुणाले ( रा नागतिर्थवाडी,) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कोडामंगले हे करीत आहेत.