विशेष प्रतिनिधी
मुंबई: माळशिरस मतदारसंघातील मारकडवाडी येथे प्रतिमतदान घेतलेले आणि ईव्हीएमवर सातत्याने शंका व्यक्त करणारे आमदार उत्तम जानकर यांनी पुन्हा मोठा दावा केला आहे. पुढच्या तीन महिन्यांत राज्यातील सरकार १००० टक्के पडणार म्हणजे पडणार असे जानकर यांनी केला आहे.
निवडणुका होऊन तीन महिने उलटले तरी अद्यापही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये ईव्हीएमवरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून महायुतीला मिळालेल्या यशाबद्दल आणि ईव्हीएमवर शंका उपस्थित केली जात आहे. तसेच यापुढे ईव्हीएमवर निवडणुका न घेता बॅलेटवर घेण्याची मागणी करण्यात येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते तथा माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला आव्हान दिले आहे.
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी तुम्हाला आव्हान दिलंय की तुम्ही जर ईव्हीएम हॅक करुन दाखवलं तर ते त्यांची संपूर्ण प्रॉपर्टी तुम्हाला भेट देण्यास तयार आहेत असे विचारल्यावर उत्तम जानकर म्हणाले, “गेल्या एक महिन्यांपासून मी ईव्हीएम संदर्भात आंदोलन करत आहे. जे माझ्या तालुक्यात झालं, तेच महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी झालेलं आहे. मी बारामतीचा अभ्यास केला. त्या ठिकाणी अजित पवार २० हजार मतांच्या फरकाने पराभूत आहेत. जयकुमार गोरे हे १३ हजार मतांच्या फरकाने पराभूत आहेत.