विशेष प्रतिनिधी
नागपुर : पुण्यातील कायदा सुव्यवस्था उध्वस्त झाली आहे. अजित पवारांना स्वतःचा माणूस आणायचा असेल तर त्याला राजकीय स्वरुप न देता पुण्यामध्ये एक कडक शिस्तीचा पोलीस कमिशनर आणला पाहिजे, अशी मागणी आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
नागपुरात पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, पुण्यातील कायदा सुव्यवस्था उध्वस्त झाली आहे. मी कोणाच समर्थन करत नाही किंवा कोणा विरोधात बोलत नाही. पोलीस आयुक्तांची ती जबाबदारी आहे. खुनाच्या घटना वाढल्या आहेत. ड्रग्ज विक्री वाढली आहे. कायदा सुव्यवस्था शिल्लक राहिली नाही. गुंड बाहेर येऊन स्वतःची मिरवणूक काढून घेतात. अजित पवारांना स्वतःचा माणूस आणायचा असेल तर त्याला राजकीय स्वरुप न देता पुण्यामध्ये एक कडक शिस्तीचा पोलीस कमिशनर आणला पाहिजे.
बीडमधील घटनेवर ते म्हणाले, धनंजय बोले पोलीस दल हाले अशी परिस्थिती आहे. एकही पोलीस अधिकारी धनंजयभाऊच्या शब्दापलीकडे जाऊ शकत नाही. त्यामुळे तिथे खून झाला तरी आकस्मित नोंद होईल आणि पोलिसांनी तो आदेश इमानदारीने पाडला याचा दुःख आहे.
वाल्मीक कराड दाऊद इब्राहिमच्या बरोबरीचाच आहे. वाल्मीक कराडला खुनाच्या गुन्ह्याखाली अटक करून पोलिसांना सगळे धागेदोरे शोधायाला हवेत. तळात जायचं असेल तर, एक महिन्याच्या पीसीआर घेतला पाहिजे. एका वर्षात 110 पेक्षा जास्त खून होतात. ही गुंडगिरी मोडून काढण्यासाठी आम्हाला मुख्यमंत्र्यांची कडक कारवाई दिसत नाही. मुख्यमंत्री बोलतात दोषींना सोडणार नाही. पण हे बोलत असताना त्यांची मानसिकता महाराष्ट्राचा जो बिहार झाला आहे तो संपवण्याची मानसिकता दिसत नाही. जोपर्यंत वाल्मिक कराड वर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा घेत नाही तो पर्यंत या प्रकरणात न्याय मिळेल असे वाटत नाही असेही वडेट्टीवार म्हणाले.
अमोल कोल्हे यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना वडेट्टीवार म्हणाले, कालचा टाईम्स ऑफ इंडीयाचा अग्रलेख आहे तो वाचला तर सरकार कोणाच्या मर्जीने आलयं हे दिसेल, महाराष्ट्रात 9 कोटी मतदार आहे तर 9 कोटी 16 लाख आले कुठून ? “झोल झालं” करून हे सरकार आले आहे. ईव्हीएमच्या भरवश्यावर सरकार आले. पाशवी बहुमत संदर्भात चर्चा करत आहे. कोल्हेंना एवढंच सांगतो त्यांनी स्व:ताच्या पक्षाकडे जास्त लक्ष देऊन आम्हाला सल्ला कमी द्यावा
कंत्राटदाराचे हजारो कोटी रुपये थकले आहेत, नवीन टेंडर झाले तरी काम करायला तयार नाही. पैसे घेऊन लायसन्स देतात. त्यामुळे अपघाताची संख्या वाढली आहे. रेशन कंत्राटदारांवर गंभीर तक्रारी आहेत. नागपूरचा असल्यामुळे कोणी पाठीशी घालत असतील, त्याला ते कंत्राट देऊ नये. मुख्यमंत्री यांना मागणी करणार आहे. भाजपच्या नेत्यांनी शिफारस केली असेल तर ते पाप भाजपच्या माथी असेल