विशेष प्रतिनिधी
अकोला: देवेंद्र फडणवीसजी आपल्या पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी काल परभणी मधील मुक मोर्चात ‘क्या हुआ तेरा वादा अजितदादा’ अशा प्रकारे वक्तव्य करून आदरणीय अजितदादांविषयी जी गरळ ओकली त्याबद्दल आपण त्यांना जाब विचारणार, की त्यांचा बेभान सुटलेला बैल आणखी मोकाट सोडणार? असा सवाल करत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी केला आहे.
आमदार अमोल मिटकरींनी एक्सवर पोस्ट करत हा प्रश्न विचारला आहे.
महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला भाजप आमदार सुरेश धसच जबाबदार राहतील, असा इशारा अमोल मिटकरी यांनी दिला आहे .मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यावरही सुरेश धस कसे बोलतायेत?असा सवालही त्यांनी केला.
अमोल मिटकरी यांनी कालच्या परभणीतल्या मोर्चातील सुरेश धस यांच्या भाषणावर टीका करत म्हटले आहे की अजित पवारांवरची टीका आम्ही सहन करणार नाही.
मस्साजोग प्रकरणात संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी केली.
सुरेश धसांना आता मुख्यमंत्र्यांनीच आवर घालावा. या प्रकरणात संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांऐवजी विरोधक धनंजय मुंडे यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करीत आहेत. आपल्याला सुरेश धसांच्या कार्यकर्त्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा गंभीर आरोप अमोल मिटकरी यांनी केला.
.
.
महाराष्ट्र सरकारने आपल्या पाच वर्षांपूर्वीच्या नितीमध्ये बदल करत बांध आणि ‘बैकवाटर’ परिसरांतील दारू विक्री आणि पिण्यावरील बंदी उठवली आहे. २०१९ मध्ये शासकीय आदेशाद्वारे या परिसरांमध्ये दारू विक्री आणि...
Read moreDetails