विशेष प्रतिनिधी
ठाणे : भारतीय जनता पार्टीची राज्यात ताकद मोठी आहे हे आम्ही मान्य करतो.पण त्याच खालोखाल शिवसेनेची ताकद देखील मोठी आहे. मात्र आमची भूमिका महायुती म्हणून एकत्र लढण्याची आहे, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.
मुंबईत भाजपची ताकद मोठी आहे. त्यामुळे भविष्यात स्वबळावर लढू शकतो असे माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले होते. यावर सरनाईक म्हणाले, काही नेते मंडळी एकला चलो ची भूमिका घेत असले तरी भविष्यात देखील आम्ही महायुती म्हणून लढू आणि राज्यातील सर्व निवडणुका एकत्र लढू असे आम्हाला वाटते. मात्र स्थानिक लेवलला काही नेत्यांची कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर आम्ही त्यावर विचार करू महानगरपालिका निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढण्याची आमची भूमिका आहे.
मराठी भाषा विषयावर संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर सरनाईक म्हणाले, संजय राऊत यांच्याकडून गेल्या अनेक वर्षांपासून भरपूर धडे घेतले आहेत.काँग्रेसकडे सर्व मराठी माणसे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळतील या आशेने बघत होते. परंतु ते त्यांनी केलं नाही. मात्र नरेंद्र मोदी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी ते करून दाखवलं. संजय राऊत जे बोलतात नेहमी त्याच्या उलट केलं जातं, सामंत आणि एकनाथ शिंदे यांचे मी ठाणेकर नागरिकांच्या वतीने अभिनंदन करतो एसटी आगारांच्या दुरावस्थेवर ते म्हणाले, एका दिवसांमध्ये कुठल्याही आगरात फरक पडणार नाही. महाराष्ट्रातील एसटी महामंडळ आणि बस स्थानकाची दारुण अवस्था आहे. लगेच सुधारणा होईल याची अपेक्षा तुम्ही करू नका. येऊरला रोपवे व्हावी अशी मागणी मी केली नाही. एकनाथ शिंदे यांच स्वप्न आहे. ठाण्यातच नव्हे तर एमएमआर क्षेत्रामध्ये वाहतूक कोंडी भविष्यात होता कामा नये.
महाराष्ट्र सरकारने आपल्या पाच वर्षांपूर्वीच्या नितीमध्ये बदल करत बांध आणि ‘बैकवाटर’ परिसरांतील दारू विक्री आणि पिण्यावरील बंदी उठवली आहे. २०१९ मध्ये शासकीय आदेशाद्वारे या परिसरांमध्ये दारू विक्री आणि...
Read moreDetails