विशेष प्रतिनिधी
जळगाव : मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाहनाचा धक्का लागल्याचे निमित्त होऊन दोन गट समोरासमोर आल्याने जळगाव जिल्ह्यातील पाळधी येथे दंगल उसळली. पाटील यांचे हे गाव आहे.
दोन गटात वाद झाल्यानंतर समाज कंटकानी रात्री साडेबारा ते एक वाजेच्या सुमारास गॅरेज समोर उभी तीन ते चार चारचाकी वाहने पेटवून दिली. या वाहनात मंत्री गुलाबराव पाटील नव्हते तर त्यांच्या पत्नी होत्या असेही समोर येत आहे.
मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाहनातून त्यांच्या पत्नी जात असताना या वाहनाचा धक्का लागल्याच्या कारणावरून पाळधी गावात दोन गटात वाद झाला. रात्री एक वाजेच्या सुमारास वाहने पेटवून दिले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर गॅरेजमधील कामगार घटनास्थळी पोहोचले. त्यांच्याकडून वाहने विझविण्याचे प्रयत्न करण्यात आले. वाहने पेटवून दिल्याची घटनेची माहिती पोलीस कर्मचार्यांना सुद्धा उशिराने मिळाली. या घटनेमध्ये समाजकंटकांनी दोन ते तीन दुकाने पेटवून दिली. काही दुकानांची तोडफोड करत नुकसान केले. अग्निशमन बंब घटनास्थळी पोहचेपर्यंत पेटविण्यात आलेली सर्व वाहने आणि दुकान जळून खाक झाली होती. पेटलेली दुकानांचे आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न प्रयत्न कामगार तसे अग्निशमन दलाच्या जवानांकडून पहाटेपर्यंत सुरू होते.thi
पाळधी मध्ये पूर्ण शांतता असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. पोलिसांच्या वाहनातून लाऊड स्पीकरच्या माध्यमातून या ठिकाणच्या ग्रामस्थांना संचार बंदीबाबत सूचना देण्यात आली होती. पाळधी गावांमध्ये पहाटे सहा वाजेपर्यंत कलम 144 अन्वये संचारबंदी लागू करण्यात आले होते.
महाराष्ट्र सरकारने आपल्या पाच वर्षांपूर्वीच्या नितीमध्ये बदल करत बांध आणि ‘बैकवाटर’ परिसरांतील दारू विक्री आणि पिण्यावरील बंदी उठवली आहे. २०१९ मध्ये शासकीय आदेशाद्वारे या परिसरांमध्ये दारू विक्री आणि...
Read moreDetails