मुंबई : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास खरच होईल का? असा सवाल करत मस्साजोगचे ग्रामस्थ अत्यंत दहशतीत आहेत, असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी पोस्ट केलेल्या फोटोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिसत आहेत. त्यासोबतच संतोष देशमुख यांच्या खुनाचा आरोप असलेला वाल्मिक कराडही यावेळी या फोटोत उभा असल्याचे दिसत आहे.
संजय राऊत यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की ग्रामस्थ म्हणतायेत “सरकारला जमत नसेल तर सरकारने गावाला लाकडं पाठवून द्यावी. आम्ही सगळे जळून घेतो. असंही कराड सुटून आल्यावर आम्हाला मारणारच आहे”. अगतिक जनता असेही त्यांनी म्हटले आहे.
संजय राऊत यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन एक ट्वीट शेअर केले आहे. यात त्यांनी एक फोटो पोस्ट करत मस्साजोगचे ग्रामस्थ अत्यंत दहशतीत आहेत, जनता अगतिक झाली आहे, असा दावा केला आहे. संजय राऊत यांनी पोस्ट केलेल्या फोटोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिसत आहेत. त्यासोबतच संतोष देशमुख यांच्या खुनाचा आरोप असलेला वाल्मिक कराडही यावेळी या फोटोत उभा असल्याचे दिसत आहे. तसेच वाल्मिक कराडच्या शेजारी धनंजय मुंडेही उभे असल्याचे दिसत आहे. या फोटोवर 21 ऑगस्ट 2024 असे लिहिल्याचे दिसत आहे.