विशेष प्रतिनिधी
बीड : जोपर्यंत आश्वासन मिळत नाही आणि मागण्यांची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आंदोलन स्थळावरून उठणार नाही असा पवित्रा बीड जिल्ह्यातील मस्साजोगच्या
गावकऱ्यांनी घेतला आहे. सरकार आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असल्याचा संतापही आंदोलकांनी व्यक्त केला. सरकार आंदोलकांचे काही बरं वाईट होण्याची वाट पाहत आहे का असा संतप्त सवालही आंदोलकांनी केला. (If the demands are not being implemented, we will not rise from the place, of massajog
The determination of the villagers)
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी अटक व्हावेत व न्याय मिळावा या मागणीसाठी मस्साजोगचे गावकरी सलग दुसऱ्या दिवशीही अन्न त्याग आंदोलन करणार आहेत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला सातवा आरोपी कृष्णा आंधळे याला तत्काळ अटक करावी,ही ग्रामस्थांची मुख्य मागणी आहे.
याबाबत धनंजय देशमुख म्हणाले, गावकऱ्यांच्या बैठकीत घेतलेला निर्णयावरवर मी सहमत आहे.. हे आंदोलन पुढे चालत राहील. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही.
तीन तासात माझ्या मुलाला संपवलं, पण तीन महिन्यात आरोपी आपडला नाही. आरोपी सापडत नाहीत, तर आम्हालाच संपवा, असा आक्रोश संतोष देशमुखांच्या आईने व्यक्त केला.आरोपींना समोर आणा, त्यांना शिक्षा करेन असेही त्या म्हणाल्या.
संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी आणि मुलगी वैभवी यांनीही लढ्याचा निर्धार केला आहे. 77 दिवसांनंतरही आरोपी मोकाटच आहेत, याकडे देशमुख कुटुंबानं लक्ष वेधलं. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पूर्ण करावा, अशी मागणी देशमुख कुटुंबाने केली. सरकारकडून ठोस आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचं देशमुख कुटुंबीयांनी स्पष्ट केले.