बीड: मूठभर लोक आंदोलन करत आहेत. पाप झाकण्यासाठी काही लोक हे करताहेत. माझ्या सोबत पण वंजारी लोक आहेत. मराठा विरुद्ध वंजारी असा वाद नाही, असे मत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केले.
बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी वाल्मीक कराडच्या समर्थनार्थ लोक आंदोलन करत आहेत. यावर सोनवणे म्हणाले, परळी शांत ठेवणं तेथील लोकप्रतिनिधी जबाबदारी आहे. त्यांचे साथीदार आहेत मान्य पणजनता कोणी नाही का? राज्य कायद्याने चालल पाहिजे. संतोष देशमुख हत्या प्रकारानंतर लोक रस्त्यावर आले होते आम्ही समजावून सांगितलं होते. त्यामुळे आंदोलन झाले नाही.
वाल्मिक कराड हा आता न्यायालयीन हा विषय आहे, न्यायालयाने जरी त्यांना फोन बद्दल विचारलं असले तरी त्यांना सात दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे, असे सांगून सोनवणे म्हणाले फरार आरोपीला पळून जाण्यासाठी कोणी तरी मदत करतंय. हा आरोपी सापडला पाहिजे. दुसरा आरोपी पुण्यातून उचलला. मी आधी सांगितला होत की पुणे कनेक्शन तपासा. एकाचाही मोबाईल सापडत नाही. एवढे दिवस पोलिसांना कसा सापडत नाही. पोलिसांनी अटक केलं आहे असं दाखवलं. पण कोणाच्या गाडीतून पकडलं मग कोण होत हे पोलीसांनी सांगितलं नाही. मोबाईल ठेवून तो बाहेर गेला असेल ना. मोबाईल न सापडणे चिंतेची बाब आहे.
धनंजय मुंडे यांच्याबाबत ते म्हणाले, याच्यात जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. मारल्यावर पोलीस गेले. मग पोलिसांना कसं कळाल. बॉडी सापडल्यावर त्यांनी सांगितलं माणूस सापडला. हे सगळं संशयास्पद आहे. जे पाटील निलंबित आहेत त्यांना आरोपी करा. मकोका लागला म्हणजे आरोपी झालाच. अवैध रित्या मालमत्ता असतील तर चौकशी झाली पाहिजे. १०० कोटीपेक्षा पुढे गैरव्यवहार असेल तर ईडी येतेच. मग येथे का आली नाही?
पंकजा मुंडे यांच्यावर सोनवणे म्हणाले, पाच वर्ष त्या कामातून बाजूला होत्या. आता कामाला लागल्या असतील. त्यामुळे त्यांना परळीची माहिती नसेल. माझ्या कामात व्यस्त आहे अस कोणी म्हणू शकत नाही. लोकप्रतिनिधी यांनी जबाबदारी झटकून चालणार नाही. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला भेट देणं गरजेचं आहे
वाल्मीक कराडची पत्नी मंजिरी कराड यांनी केलेल्या आरोपावर सोनवणे म्हणाले, माझी खुली किताब आहे. ताई साहेबांवर मला काय बोलायचं नाही. माझ काय काढता येत ते काढा . माझ्यावर आरोप करत असतील तर त्यांना करु द्या
महाराष्ट्र सरकारने आपल्या पाच वर्षांपूर्वीच्या नितीमध्ये बदल करत बांध आणि ‘बैकवाटर’ परिसरांतील दारू विक्री आणि पिण्यावरील बंदी उठवली आहे. २०१९ मध्ये शासकीय आदेशाद्वारे या परिसरांमध्ये दारू विक्री आणि...
Read moreDetails