विशेष प्रतिनिधी
बीड: मी भीक मागतो. आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री तुम्हीच व्हा असे म्हणत आमदार सुरेश धस यांनी देवेंद्र फडणवीस यांनी बीडचे पालकमंत्री व्हावे,अशी मागणी केली आहे.
पत्रकारांशी बोलताना आमदार धस म्हणाले,शस्त्र परवाना प्रकरणा विषयी जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो आहे. एसपी, डीवायएसपी सुद्धा बंदूक परवाना देत असतील तर बीड जिल्हा बिहारपेक्षा पुढचे काबूलस्थान होतो आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी हे थांबवावे. कारवाई केली नाही तर त्यांच्यावर कारवाईची मागणी करावी लागेल. हे जंगल राज साफ होण्यासाठी फडणवीसांनी आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावे.
ज्या लोक प्रतिनिधी पदे भाड्याने दिली, त्यांनी शिफारस दिली त्यांची देखील चौकशी झाली पाहिजे या बाबत सुरेश धस फोन येत असेल तर माझ्यावर कारवाई करा असेही ते म्हणाले. माझ्या मतदार संघात केमिकल ताडी विकत होते.
माझ्या इथल्या हात भट्या बंद करून टाकल्या. 307 म्हणजे कुणाच्या प्रयत्नाच्या केस ज्यांच्यावर आहेत त्यांचे वाढदिवस साजरे करायचे. नवीन एसपी आहेत. ते कारवाई करत आहेत. जे सोशल माध्यमावर फोटो काढतात त्यांच्यावर 307 सारखे गुन्हे दाखल करत आहेत चांगली बाब आहे. यावर कारवाई करावी.पुढच्या 15 दिवसात कारवाई झालीच पाहिजे ही अपेक्षा आहे. जी मालमत्ता सांगितली त्याची जप्ती थांबू नये. आकाची प्रॉपर्टी समोर येईल.
संतोष देशमुख आणि बीड जिल्ह्यातील जंगल राज यांचा फोकस दुसरीकडे नेऊ नये असे सांगत धस म्हणाले, प्राजक्ता माळी विषय माझ्यासाठी संपलेला आहे. जे होईल त्याला मी सामोरे जाईल.लोक घाबरत आहेत. पण मी घाबरत नाही.
वाल्मीक कराडला अटक झाली की नाही अशा प्रकारचा संभ्रम आहे. मी त्यावर काही बोललो नाही. जोपर्यंत सीआयडी कडून माहिती येत नाही तो पर्यंत मी काही सांगणार नाही. मुख्यमंत्र्यांनी तपासाला गती दिली आहे मी यावर समाधानी आहे, असेही धस म्हणाले.