राज्याच्या माजी मंत्र्यांच्या मुलाचे अपहरण झाल्याची चर्चा सुरू झाल्याने खळबळ उडाली होती. मात्र प्रत्यक्ष प्रकार समोर आला.ऋषिराज सावंत बेपत्ता नाही, तो मित्रासोबत आहे. पण तो नेमकं कुठे आहे याची माहिती नसल्याचं तानाजी सावंत म्हणाले. तो चार्टर फ्लाईटने बाहेर गेला असल्याची माहिती ड्रायव्हरने दिली असेही सावंत यांनी सांगितले.
माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण झाल्याच्या बातम्या प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा तपास सुरू केला. त्यावेळी तानाजी सावंत हे पुणे पोलिस आयुक्तालयात दाखल झाले. पोलिसांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ऋषिराज सावंत याचे अपहरण झाले नसून तो मित्रासोबत बाहेर गेल्याची माहिती त्यांनी दिली.
तानाजी सावंत म्हणाले की, “ऋषिराज सावंत बेपत्ता नाही, तो त्याच्या मित्रासोबत आहे. पण नेमकं कुठे आहे याची माहिती नाही. तो कुठेही जाणार असेल तर तो सांगतो. मात्र इथे त्याने त्याची गाडी वापरली नाही. तो दुसऱ्या गाडीतून गेला. त्यामुळे मी कॉन्शस झालो. अचानक तो एअरपोर्टवर कसा गेला म्हणून मी सीपी साहेबांना फोन केला. पण आता कळलं तो चार्टरने बाहेर गेला आहे. तशी माहिती त्याच्या ड्रायव्हरने दिली. यासंदर्भात आम्ही अधिकची माहिती घेत आहोत.”
तानाजी सावंत यांच्या मुलाचे पुणे विमानतळ परिसरातून अपहरण झाल्याचा एक निनावी फोन पुणे पोलिस कंट्रोल रुमला आला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. ऋषिकेश सावंत यांचा स्विफ्ट गाडीतून चौघांनी अपहरण केल्याच्या बातम्या समोर आल्या. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या कात्रजमधील निवासस्थानी जाऊन तपास सुरू केला. या आधी ऋषिकेश सावंत यांना खंडणीसाठी कुणाचा कॉल आला होता का याची माहिती पोलिसांनी घेतली.
सावंत यांच्या ड्रायव्हरने दिलेल्या माहितीनुसार ऋषिराज आणि त्याच्या दोन मित्रांसह त्याने त्यांना पुणे विमानतळावर d4 गेट वर सोडलऋषिराज कधीच न सांगता कुठे जात नसल्याने तानाजी सावंत घाबरले त्यानंतर त्यांनी थेट सीपी ऑफिस गाठलं: पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्याशी त्यांची चर्चा झालीयानंतर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व यंत्रणा त्यांच्या शोध घेण्यासाठी कामाला लागली.