विशेष प्रतिनिधी
पुणे : वाढदिवसाची पार्टी करून चाललेल्या युवकांची वार थांबलेल्या बसला धडकून झालेल्या भीषण अपघातात दोन युवकांचा मृत्यू झाला. आज सकाळी पहाटे पाचच्या सुमारास बाह्यवळण महामार्गावर वडगावब्रिज जवळ हा अपघात झाला. (Car accident involving birthday party youths kills two)
रात्रभर वाढदिवसाची पार्टी करून सहा युवक चालले होते. पहाटे पाचच्या सुमारास बाह्यवळण महामार्गावर वडगाव ब्रिजजवळ थांबलेल्या बसला मागून येणाऱ्या त्यांच्या स्विफ्ट कारने जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की दोन युवक जागीच ठार झाले. गंभीर जखमी झालेल्या चौघांना आधी नवले हॉस्पिटल व नंतर खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.