विशेष प्रतिनिधी
मुंबई : बीड जिल्हयातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासासाठी सरकारने न्यायालयीन समिती गठीत केली आहे.
संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची मागणी मान्य करण्यात आली आहे.
बीड सरपंच हत्या प्रकरणाचा तपास सध्या सीआयडी आणि एसआयटीकडून सुरु आहे. राज्य सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी एका समितीची स्थापना केली होती. या समितीमध्ये बदल करावा, अशी मागणी केली जात होती. त्या मागणीनुसार राज्य सरकारने त्या समितीमध्ये बदल करत नव्या समितीची स्थापना केली होती. सीआयडी आणि या समितीकडून या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात तपासासाठी न्यायालयीन समितीचीदेखील मागणी काही जणांकडून केली जात होती. या प्रकरणातील प्रत्यक्ष हत्या करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे. केवळ कृष्णा आंधळे नावाचा आरोपी हा फरार आहे. त्याचादेखील शोध सुरु आहे. तसेच हत्या प्रकरणाचा कट कोणी रचला होता, हत्या का केली? याचा सखोल तपास केला जातोय. या प्रकरणी सीआयडी आणि एसआयटीकडून कोर्टात अनेक दावे करण्यात आले आहेत. त्यानंतर आता याच प्रकरणी राज्य सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. राज्य सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी माजी न्यायाधीश एम. एल. ताहलियानी यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय चौकशी समितीची स्थापना केली आहे. राज्य सरकारकडून याबाबत जीआरदेखील काढण्यात आला आहे.
महाराष्ट्र सरकारने आपल्या पाच वर्षांपूर्वीच्या नितीमध्ये बदल करत बांध आणि ‘बैकवाटर’ परिसरांतील दारू विक्री आणि पिण्यावरील बंदी उठवली आहे. २०१९ मध्ये शासकीय आदेशाद्वारे या परिसरांमध्ये दारू विक्री आणि...
Read moreDetails