विशेष प्रतिनिधी
पुणे : समलैंगिक तरुणांना ग्राईंडर ॲपवार आकर्षित करून त्यांच्याशी मैत्री केल्यानंतर भेटायला बोलावून लुटण्याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. ( Attracting gays reveals another form of exploitation through the Grindr app)
मैत्री करुन तरुणाला आडबाजूला बोलावून त्याला लुटणाऱ्या दोघांना मुंढवा पोलिसांनी अटक केली.
करण ऊर्फ कॅरी (बापू) विशल लाचारकर (वय २३, रा. ताडीवाला रोड) आणि मनिष बबन निंबाळकर (वय २१, रा. गोपाळपट्टी, मांजरी, मुळ रा. राळेगण म्हसोबा, ता. जि़. अहिल्यानगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. एका तरुणाची ग्राइंडर या समलैंगिकांच्या सोशल नेटवर्किंग ॲपवरबापू नावाच्या व्यक्तीबरोबर ओळख झाली होती. त्याने या तरुणाला तुला भेटायचे आहे, असे सांगून मगरपट्टा येथे बोलवून घेतले. त्यानंतर त्याला दुचाकीवर बसवून लक्ष्मी लॉन्सचे समोरील मोकळ्या जागेत रात्री घेऊन गेला. तेथे त्याचा एक साथीदार अगोदरच येऊन थांबला होता. दोघांनी मिळून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. त्याच्या गळ्यातील सोन्याची साखळी जबरदस्तीने काढून घेऊन दोघे पळून गेले होते. २३ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता ही घटना घडली होती. बदनामी होईल, म्हणून या तरुणाने पोलिसांकडे तक्रार केली नव्हती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी त्याने तक्रार दिली.
याबाबत पोलीस हवालदार विनोद साळुंके यांना माहिती मिळाली. पोलिसांनी करण लाचारकर याला पकडले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीतून मनिष निंबाळकर याला पकडण्यात आले. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी २४ तासाच्या आत दोघांना अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक राजु महानोर तपास करीत आहेत.
सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर, पोलीस अंमलदार विनोद साळुंके, शिवाजी जाधव, योगेश गायकवाड, राहुल धोत्रे, राजू कदम, अक्षय धुमाळ, स्वप्निल रासकर, योगेश राऊत यांनी ही कामगिरी केली.
अशाच प्रकारे समलैंगिक तरुणांना लुटणाऱ्या टोळीचा काही दिवसांपूर्वी नांदेड सिटी पोलिसांनी पर्दाफाश केला होता. तरुणांना निर्जनस्थळी बोलावून त्यांना कोयत्याचा धाक दाखवीत लुटणारी टोळी पोलिसांनी गजाआड केली होती. यामध्ये तीन अल्पवयीन मुलांचा समावेश होता. भारत किसन धिंडले (वय १८, रा. मुक्ताई हाईटस, सांगळे घाट, धायरी) हा प्रमुख आरोपी होता. याप्रकरणी एका ३२ वर्षीय हॉटेल व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. त्यावरून नांदेड सिटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १४ जानेवारी रोजी सायंकाळी डीएसके विश्व शाळेमागे घडला होता.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परदेशी व्यावसायिकांसाठी वापरल्या जाणाऱ्या H-1B व्हिसा कार्यक्रमात मोठा बदल करत, प्रत्येक व्हिसा धारकावर दरवर्षी $100,000 (₹83 लाखांहून अधिक) शुल्क लावण्याचा निर्णय घेतला...
Read moreDetails