विशेष प्रतिनिधी
पुणे : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्याला जेरबंद करण्यात आले आहे. ( Datta Gade, the accused in the Swargate rape case, has finally been arrested)
गाडे याचा युद्धपातळीवर शोध सुरू होता. स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तो आपल्या गुणाट या गावी गेला असल्याचे समोर आले होते. गावकऱ्यांनी त्याला गावात पहिल्याचे समोर आले होते. त्यानुसार पोलिसांनी गुनाट या गावातच त्याचा शोध घेण्याची ठरवले. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला. आणि गुनाट गावात आणि आजूबाजूच्या परिसरात त्याचा शोध सुरू झाला. ड्रोनच्या माध्यमातून उसाच्या परिसरात पोलीस त्याचा शोध घेत होते. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास तो एका शेतात पोलिसांना सापडला.
गाडेच्या शोधासाठी पुणे पोलिसांची १३ पथके रवाना करण्यात आली होती. तसेच डॉगस्कॉड, ड्रोनच्या साहाय्यानेही शोधमोहीम सुरु होती.
बलात्कार केल्यानंतर आरोपी गाडे थेट जन्मगाव असलेल्या शिरूर तालुक्यातील गुणाट गाव परिसरात गेल्याची माहिती समोर आली होती. परिसरातील शेतात लपवून बसला असण्याची ही शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत होती. त्या दृष्टीने पोलिसांनी श्वान पथक बोलावून त्या मार्फत आरोपीचा शोध घेतला जात होता. अखेर शुक्रवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास तो स्वारगेट पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील कर्मचाऱ्यांच्या हाताला लागला.
गाडे दोन दिवस उसाच्या शेतात लपून बसला होता. पण त्याला जेवायला मिळत नव्हतं. भूकेनं व्याकूळ झाल्यानंतर पाणी पिण्यासाठी रात्री त्याच्या नातेवाईकांकडे येऊन गेला होता अशी गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी ड्रोन आणि श्वान पथकाच्या सहाय्याने उसाच्या शेतात शोध घेतला.
रात्री एक वाजता तो कॅनॉलजवळ झोपलेला असताना शोधमोहीम राबवणाऱ्या पोलिसांना हालचाल दिसली आणि स्वारगेट पोलिसांच्या तपास पथकातील कर्मचारी शंकर संपते, सागर केकान, नाना भांदुर्गे, कुंदन शिंदे आणि सुजय पवार या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला शिताफीने पकडले.
कॅनॉलजवळ झोपलेला असताना पोलिसांच्या नजरेस पडला. पोलिसांनी दबक्या पावलांनी त्याच्या दिशेने वाट काढली. काही क्षणातच त्याला ताब्यात घेतलं. ७० तासांच्या शोध मोहिमेला पोलिसांना अखेर यश मिळालं .
त्यानंतर तातडीने त्याला ताब्यात घेऊन पुण्याला रवाना करण्यात आले आहे. सध्या त्याला लष्कर पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले आहे