विशेष प्रतिनिधी
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे देशभरातून सात वेगवेगळ्या साइट्स जागतिक वारसा स्थळ म्हणून नामांकन करण्याकरिता भारत सांस्कृतिक मंत्रालयाने ठेवल्या होत्या. जागतिक वारसा स्थळ म्हणून छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले ज्यातील 11 महाराष्ट्रात आणि एक जिंजी हा तामिळनाडूत आहे असे 12 किल्ले नामांकित करण्याचा निर्णय घेतला यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. ( 12 forts of Chhatrapati Shivaji Maharaj declared World Heritage Site, Chief Minister Devendra Fadnavis thanked the Prime Minister)
मराठा लष्करी भूप्रदेश’ (Maratha Military Landscape of India) या संकल्पनेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 गड-किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश केला आहे. महाराष्ट्र शासनाने फेब्रुवारी 2025 मध्ये प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर, युनेस्कोने ऐतिहासिक निर्णय घेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या आणि मराठा साम्राज्याच्या जाज्वल्य इतिहासाचे साक्षीदार असलेल्या 12 गड-किल्ल्यांचा युनेस्कोने जागतिक वारसा यादीत समावेश केला आहे. हा शिवप्रेंमींचा विजय आहे, असे म्हणत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. युनेस्कोच्यो संपूर्ण प्रक्रियेची माहिती देत मुख्यमंत्री म्हणाले की, जगभरातल्या शिवप्रेमींचे मी मनापासून अभिनंदन करतो. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले हे जागतिक वारसा स्थळ म्हणजेच वर्ल्ड हेरिटेज साईट घोषित करण्याकरिता नॉमिनेट केले होते. खरं म्हणजे, पंतप्रधान मोदींकडे देशभरातून 7 वेगवेगळ्या साइट्स गेल्या होत्या, त्या साइट्सना जागतिक वारसा स्थळ म्हणून नॉमिनेट करण्याकरिता आपल्या भारत सांस्कृतिक मंत्रालयाने पंतप्रधान मोदींनी ठेवले होते. त्यामुळे मी पंतप्रधान मोदींचे आभार मानेल की, त्यांनी त्यापैकी जागतिक वारसा स्थळ म्हणून छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले ज्यातील 11 किल्ले हे महाराष्ट्रात आहेत आणि एक किल्ला जिंजी हा तामिळनाडूत आहे असे 12 किल्ले नॉमिनेट करण्याचा निर्णय घेतला.
मुख्यमंत्री म्हणाले, किल्ले रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी आणि जिंजी असे हे 12 किल्ले आहेत आणि विशेषतः या 12 किल्ल्यांच्या संदर्भात हे स्थापत्य आहे. वेस्टर्न घाट, समुद्र, जंगल अशा नैसर्गिक विविधतेत हे स्थापत्य तयार करण्यात आले. दरवाजे दिसत नाही असे तयार करण्यात आले. अशा सर्व गोष्टी युनेस्को समोर ठेवल्या. त्यांचे डेलिगेशन आले. त्यांनी व्हिजिट केली. आशिष शेलार यांच्या नेतृत्वात एक डेलिगेशन युनेस्कोत गेले. टेक्निकल सादरीकरण केले. एकूण 20 देश सदस्य आहेत जण मतदानाचा अधिकार आहे. त्यांच्या दुतावासांसोबत मीही बोललो. परराष्ट्र मंत्रीही बोलले. आम्ही मोदींनाही भेटलो. तुम्ही नॉमिनेशन केले. मतदानाची प्रक्रिया आहे. 20 देश आहेत. भारत सरकारने पुढाकार घ्या, असे सांगितले. त्या त्या देशाच्या सरकारशी चर्चा केली, असे यावेळी फडणवीसांनी सांगितले.
आपले स्थायी मेंबर शर्मा यांनी यात महत्त्वाची भूमिका निभावली. ते आणि आपले अप्पर मुख्य सचिव खारगे तिथे उपस्थित होते. 20 देशांनी आपल्या बाजूने मतदान केले. एकमताने हे किल्ले जागतिक वारसा केंद्र आहे, हे घोषित केले. हा शिवप्रेमींचा विजय आहे. सर्व देशाच्या लोकांनी हे किल्ले बांधत असताना जे चातुर्य आणि स्ट्रॅटेजी वापरली त्याचे कौतुक केले. किती पुढचा विचार यात केला होता, याचे अनेकांना आश्चर्य वाटले. आपले किल्ले वर्ल्ड मॅपवर आले आहेत. युनेस्कोच्या संकेत स्थळावर याची माहिती जाईल. वर्ल्ड टुरिझम मॅपवर हे किल्ले जाणार आहे, असे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.