विशेष प्रतिनिधी
बसनकांठा : गुजरातच्या
बनासकांठा येथील डीसा जीआयडीसीमध्ये फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग लागून 17 कामगारांचा मृत्यू झाला.
हा स्फोट इतका भीषण होता की, संपूर्ण कारखान्याचे बांधकाम कोसळले. त्याखाली देखील काही मजूर अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.( 17 workers die in massive fire at firecracker warehouse)
मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील डीसामध्ये फटाक्यांच्या कारखान्याला लागलेल्या आगीत १७ जणांचा मृत्यू झाला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलासह एसडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. स्फोटानंतर या कारखान्याचा काही भाग कोसळला. स्फोटानंतर भिंती आणि छत कोसळल्याने अनेक कामगार ढिगा-याखाली अडकले.
बॉयलरचा स्फोट झाल्याने फटाक्यांच्या कारखान्यात आग लागली. आतापर्यंत सात मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्व मजूर मध्य प्रदेशातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. स्फोटावेळी कामगार कारखान्यात काम करत होते. अचानक स्फोट झाल्याने मजुरांना पळता आले नाही.