विशेष प्रतिनिधी
पुणे : माजी मंत्री एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह 7 जणांवर रेव्ह पार्टी प्रकरणी अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या पार्टीत दारूसह 2.7 ग्रॅम कोकेन आणि 70 ग्रॅम गंज जप्त केला असल्याची माहिती पोलिस उपआयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे यांनी दिली. ( 2.7 grams of cocaine and 70 grams of rust seized along with alcohol at Kharadi rave party crimes against seven people including Khadses son-in-law)
Kharadit रेव्ह पार्टीमध्ये टाकण्यात आलेल्या धाडीमध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या जावयासह सात जणांवर कारवाई करण्यात आली. या पोलिसांनी या ठिकाणाहून कोकेन, गांजा, हुक्का पॉट आणि फ्लेवर, दारू आणि बीयरच्या बाटल्यांसह इतर काही साहित्य जप्त केलं आहे. 2.7 ग्रॅम कोकेन,70 ग्रॅम गांजा, हुक्का पॉट आणि फ्लेवर, दारू आणि बीयरच्या बाटल्या, दहा मोबाईल, दोन चार चाकी गाड्या आणि 41 लाख रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी प्रांजल मनिष खेवलकर( वय 41), निखिल जेठानंद पोपटाणी (35), समीर फकीर महमंद सय्यद (41), सचिन सोनाजी भोंबे (42), श्रीपाद मोहन यादव (27), ईशा देवज्योत सिंग (22) आणि प्राची गोपाल शर्मा (22) यांना अटक करण्यात आली आहे.
रविवारी पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास सुमारास पुण्यातील खराडी भागातील स्टेबर्ड अझुर सुट याठिकाणी गुन्हे शाखेने ही कारवाई केली. आरोपींकडून 41 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. खराडी पोलिस ठाण्यात एनडीपीएस. अॅक्ट कलम 8 (क), 22 (ब) (11) अ, 21 (ब), 27 कोटपा 7 (2), 20 2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस उपायुक्त पिंगळे म्हणाले की, पुढील तपास सुरू आहे. न्यायालयीन प्रक्रिया असल्याने इतर बाबी या तपासाअंती समोर येतील. आरोपींची वैद्यकीय तपासणी केली आहे. त्याच्या काही बाबी समोर येतील. या पार्टीमध्ये अजून कुणी येणार होतं का याचा तपास सुरू आहे. कुठलीही गोष्ट अधांतरी समोर येणार नाही. सर्व गोष्टी या तपासाअंती समोर येतील.