विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे पोलिसांकडून सायबर फ्रॉड करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश करत नेपाळच्या 2 आरोपींसह तामिळनाडूमधील 1 अशा 3 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. (Pune police busted an international cyber fraud gang, turnover of Rs 13 crore from 50 accounts)
पुण्यात एका इसमाला फसवत 68 लाख 11 हजार 692 रुपयांची फसवणूक केल्याससह अटक आरोपींवर मुंबई पुण्यासह बेंगलोर मध्ये देखील सायबर फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हे दाखल आहेत.
शेअर मार्केट मध्ये ऑनलाईन गुंतवणूक करायला सांगून टोळीकडून अनेक लोकांची कोट्यावधी रुपयांची फसवणुक देखील करण्यात आली आहे. लाचीन शेर्पा (नेपाळ),बिन बहादूर प्रधान (नेपाळ), तर रमेश कुमार अभिमन्यू (तमिळनाडू) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
अटक आरोपींकडून 7 मोबाईल,अनेक बँकांचे पासबुक, चेकबुक, यासह बनावट पासपोर्ट देखील पुणे पोलिसांकडून जप्त करण्यात आले आहेत. सदर टोळी ही आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारांसाठी काम करत असून 50 अकाउंट वरून 13 कोटी रुपयांची उलाढाल केल्याची माहिती पोलीस उपयुक्त संभाजी कदम यांनी यावेळी दिली.