विशेष प्रतिनिधी
मुंबई : लोकांनी तुतारी आणि शिट्टीला त्यांची जागा दाखवून दिली. शिट्टी आणि तुतारी दोन्ही बंद पडल्यात म्हणून आता घरची आठवण यायला लागली, अशी टीका भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी माजी आमदार संदीप नाईक यांच्यावर केली आहे.
वनमंत्री गणेश नाईक यांचे चिरंजीव संदीप नाईक यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला होता. मंदा म्हात्रे यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. आता पुन्हा नाईक भाजपमध्ये येण्याची चर्चा आहे. त्यावर टीका करताना म्हात्रे म्हणाल्या, जशी मुलं असतात ना घरातून बाहेर गेल्यावर काही नाही मिळाल्यावर आई वडिलांची आठवण येते. तशी त्यांना आई वडिलांची आठवण यायला लागली आहे.काम करणारा कोण आणि स्टंट करणारा कोण हे जनतेने दाखवून दिले आहे .जेष्ठ नागरिक म्हणून ज्यांनी मला हिणवलं त्याच जेष्ठ नागरिकांनी त्यांना त्यांची जागा दाखवली.
निवडणुकीनंतर गायब झालेले नवी मुंबईचे युवराज काल झाडे तोडू नये म्हणून सिडको मध्ये गेले. आता त्यांचे वडीलच वनमंत्री आहेत. त्या वन मंत्र्यांनी सांगावं आम्ही नवी मुंबईतील एकही झाड कुठल्याही प्रकल्पात तोडू देणार नाही. त्या कोस्टल रोड साठी मी सिडको एमडीशी बोलेय त्यांनी सांगितलंय. एकही झाड तुटणार नाही. पण आता वन मंत्री त्यांचेच वडील आहेत त्यांच्या वडिलांनी डिक्लेअर करावं झाड तुटणार नाही ते असा टोलाही म्हात्रे यांनी मारला.
महाराष्ट्र सरकारने आपल्या पाच वर्षांपूर्वीच्या नितीमध्ये बदल करत बांध आणि ‘बैकवाटर’ परिसरांतील दारू विक्री आणि पिण्यावरील बंदी उठवली आहे. २०१९ मध्ये शासकीय आदेशाद्वारे या परिसरांमध्ये दारू विक्री आणि...
Read moreDetails