Okविशेष प्रतिनिधी
सोलापूर : माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कार्यकर्त्यांच्या गुंडगिरीचा प्रकार सोलापुरात समोर आला आहे. शिंदे यांचा नातू अभिनेता वीर पहारिया यांच्यावर जोक केल्याने मुंबईतील स्टँड अप कॉमेडियन प्रणित मोरे याला दहा ते पंधरा जणांनी मारहाण केली. (Sushilkumar Shinde’s supporters beat comedian)
सोलापुरातील एका शो दरम्यान मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे. अभिनेता वीर पहारियावर विनोद केल्याने सोलापुरातील त्याच्या फॅन्सकडून मारहाण झाल्याचा दावा,प्रणित मोरे याने केला आहे. वीर पहारिया हा माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. त्याचा नुकताच स्काय फोर्स हा चित्रपट रिलीज झाला असून, या चित्रपटानं 100 कोटींच्या क्लबमध्ये जागा मिळवली आहे.
स्टॅन्डअप कॉमेडीयन प्रणित मोरे याने केलेल्या दाव्यानुसार 2 फेब्रुवारी रोजी सोलापुरातल्या एका हॉटेलमध्ये त्याचा स्टॅन्डअप शो झाला. या शो नंतर 11-12 लोकांचा एक गट फोटोसाठी विनंती करतं पुढे आला. त्यांनी प्रणितला मारहाण करून धमकी दिली. तन्वीर शेख नावाचा व्यक्ती हा या ग्रुपचा लीडर असल्याचंही त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. याबाबत पोलिसांकडे दाद मागितल्यानंतर त्यांनी देखील दखल घेतली नसल्याचा आरोप प्रणित मोरे याने केला आहे.
त्या जमावातील एकाने, “अगली बार वीर पहारिया बाबा पे जोक मारके दिखा” अशी धमकीही दिली आहे. त्याच्याबद्दल पुन्हा वक्तव्य केल्यास वाईट परिणाम भोगावे लागतील असा इशाराही प्रणितला देण्यात आला आहे.
प्रणित मोरे याने इंस्टाग्रामवर पोस्ट करत आपल्याबाबतीत घडलेला संपूर्ण घटनाक्रम सांगितला. त्यानंतर प्रणित मोरेच्या पोस्टवर अभिनेता वीर पहारियाकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. या गोष्टीशी माझा संबंध नाही, ज्यांनी मारहाण केल्याचा दावा केला जात आहे, त्यांना मी ओळखत नाही. तरीही असा प्रकार घडला असेल तर मी माफी मागतो. जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होईल याबाबतची शाश्वती मी देतो, असे अभिनेता वीर पहारिया याने म्हटले आहे.
स्मृती शिंदे या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांची मुलगी आहे. १९९३ मध्ये त्यांचे लग्न सुप्रसिद्ध बिझनेसमन संजय पहारिया नावाच्या व्यावसायिकाशी झाले. त्यांना शिखर आणि वीर पहारिया अशी दोन मुले आहेत. तथापि, लग्नाच्या काही वर्षांनंतर, त्यांच्या आनंदी वैवाहिक जीवनात मतभेद निर्माण होऊ लागले. त्यामुळे त्यांनी घटस्फोट घेतला.
स्मृती शिंदे यांनी सोबो फिल्म्स नावाचे एक प्रोडक्शन हाऊसचीही स्थापन केली आहे. अनेक टेलिव्हिजन शोची सोबो फिल्म्सच्या बॅनरखाली निर्मिती करण्यात आली. अनेक कंपन्यांच्या संचालक म्हणून देखील त्या काम करतात.
महाराष्ट्र सरकारने आपल्या पाच वर्षांपूर्वीच्या नितीमध्ये बदल करत बांध आणि ‘बैकवाटर’ परिसरांतील दारू विक्री आणि पिण्यावरील बंदी उठवली आहे. २०१९ मध्ये शासकीय आदेशाद्वारे या परिसरांमध्ये दारू विक्री आणि...
Read moreDetails