विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : मुंबई महापालिका जिंकण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील त्यांना वाटलं असेल.त्यामुळे राज ठाकरेंना आपल्याकडे घ्या आणि उद्धव ठाकरेंना वेगळंच राहू द्या, असा त्यांचा डाव आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली असा दावा माजी खासदार आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.
खैरे म्हणाले, मुख्यमंत्री हे खूप हुशार आहेत, बुद्धिमान आहेत. मुख्यमंत्री एक एक गेम खेळत असतात. पण तो गेम आता त्यांच्यावर उलटेल. कारण शिंदेंना बाजूला केलं तर शिंदेंचं मोठं बंड होऊ शकतं. त्यामुळे भाजपला ओरिजनल ठाकरेंशिवाय पर्याय नाही.
चंद्रकांत खैरे म्हणाले, लहान लहान मुलांना आम्ही मोठे केलं. अनेकांना नगरसेवक, उपमहापौर, महापौर केलं. मात्र, तेच लोक आज गद्दार झाले आहेत.पैशांच्या हव्यासापोटी यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मात्र, गद्दारी करणाऱ्यांचे खूप हाल होतात. आजचं मी पाहिलं एकनाथ शिंदेंना बाजूला केल्याची बातमी आली. गद्दारी करणाऱ्यांची अशीच अवस्था होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. ही भेट केवळ मैत्रीसाठी होती. त्यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असे फडणवीस यांनी स्पष्ट केले होते.
देशभरात नवीन GST-2.0 नियम लागू झाल्यानंतर आणि नवरात्रीचा शुभारंभ झाल्यामुळे वाहन विक्री क्षेत्रात मोठी उलाढाल झाली आहे. ग्राहकांनी पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणावर कार खरेदी केल्या असून ऑटोमोबाईल उद्योगाला...
Read moreDetails