विशेष प्रतिनिधी
सिंधुदुर्ग : उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी संजय राऊत यांचा विरोध होता. संजय राऊत हेच मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न बघत होते, असा दावा मत्स्य व्यवसाय व बंदर मंत्री नितेश राणे यांनी केला आहे.
( Nitesh Rane claims that it was Sanjay Raut dreamed of becoming the Chief Minister)
उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करणार होते. त्या बाबतीत प्रामाणिक आहेत. मात्र भारतीय जनता पक्षाने शब्द पाळला नाही. एकनाथ शिंदे विधिमंडळ नेते झाले होते. पण अजित पवार आणि शरद पवार या सर्वांची भूमिका होती. एक मेसेंजर आम्हाला चालणार नाही. ते फार ज्युनिअर आहेत. त्यांच्या हाताखाली आमचे वरिष्ठ नेते काम करणार नाही त्यांनी जर शब्द पाळला असता शिंदेच तेव्हा मुख्यमंत्री झाले असते, असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला होता.
यावर परतवा करताना नितेश राणे म्हणाले, संजय राऊत हेच मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न बघत होते. राऊत यांनी आमदारांना फोन केला होता. पण जमायच्या टायमाला पाच-सहा आमदार जमले. संजय राऊत यांनी खरं सांगावं त्यांना उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवायचं होतं का . आमच्याकडे असे सांगणारे काही विटनेस आहेत. आमच्याकडे असे काही सांगणारे आमदार आहेत की उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवण्याला संजय राऊत यांचा विरोध होता. उद्धव ठाकरे यांचा गेम संजय राऊत यांनी केला.तू तुझ्या मालकाचा गेम का केला हे महाराष्ट्राला सांग. दुसऱ्याच्या घरात बघू नकोस. स्वतःच्या बुडाखाली काय लपलय त्याची माहिती महाराष्ट्राला द्या असा टोलाही राणे यांनी राऊत यांना मारल.
छत्रपती स्मारक उभारताना पूर्ण काळजी घ्यायच्या सूचना दिलेल्या आहेत. सुतार साहेबांच्या नेतृत्वाखाली हा पुतळा उभारला जातोय जो डाग जिल्ह्यावर लागलेला आहे तो पुसला जाईल. 100 दिवसात हा पुतळा पूर्ण केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
राहुल गांधी यांच्यावर टीका करताना राणे म्हणाले,
औरंगजेबाच्या पिल्लावळीकडून आणखीन काही अपेक्षा नाही. हे हिरवे साप आहेत, औरंगजेबाच्या विचारावरती हे राजकारण करतात. नेहमी आमच्या शिवरायांचा यांना द्वेषच दिसणार. राहुल गांधींनी देशाची शिवप्रेमींची माफी मागितली पाहिजे