गोखले शिक्षण संस्थेचे जे.डी.सी. बिटको, आय.एम.एस.आर. महाविद्यालय नाशिकचे कार्यालय अधीक्षक श्री. विनोद संपतराव पाटील यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा २०२५ चा गुणवंत शिक्षकेतर सेवक पुरस्कार दि. १० फेब्रुवारी रोजी विद्यापीठाचा ७६ वा वर्धापनदिन सोहळयात पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात प्रदान करण्यात आला.
विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली व प्र-कुलगुरु डॉक्टर पराग काळकर यांच्या उपस्थितीत विद्यापीठाचे स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा गुणवंत शिक्षकेतर सेवक (महाविद्यालय) पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री विनोद पाटील यांचे गोखले शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. दीप्ती देशपांडे, अध्यक्ष डॉ. आर पी देशपांडे, विभागीय सचिव डॉ राम कुलकर्णी, संस्थेचे प्रोजेक्ट डायरेक्ट पीएम देशपांडे, इ अँड एम संचालक श्री शैलेश गोसावी, संस्थेचे कुलसचिव श्री गिरीश नातू, जेडीसी बिटकोच्या संचालिका डॉ. सरिता औरंगाबादकर यांनी अभिनंदन करुन भविष्यातही आपल्या गुणवत्तेत अशाच पध्दतीने वाढ होवो, अश्या शुभेच्छा व्यक्त केला आहेत.