विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राच्या वैचारिकतेला लागलेली कीड म्हणजे संजय राऊत आहे, अशी टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली. ( Sanjay Raut is a pest to Maharashtra’s ideology, Chitra Wagh’s criticism)
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळत होते असा आरोप विधान परिषदेच्या उपसभापती डॉ . नीलम गोऱ्हे यांनी केला होता. यावरून संजय राऊत यांनी गोऱ्हे यांना निर्लज्ज, विश्वासघातकी बाई असे म्हटले.संजय राऊत यांनी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य केले. यावर आपल्या ‘एक्स’ अकाऊंटवर पोस्ट करत चित्रा वाघ यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.
चित्रा वाघ म्हणाल्या की, “नीलम गोऱ्हे या संविधानिक पदावर आहेत. संविधानिक पदही जाऊ द्या, पण एका महिलेबद्दल संजय राऊत हे इतक्या घाणेरड्या भाषेत बोलतात. महिलांबद्दल अतिशय वाईट बोलणे आणि त्यांना अश्लील शिव्या देणे हा संजय राऊतांचा इतिहास आहे,” अशी टीका त्यांनी केली.
“स्वप्ना पाटकर यांना दिलेल्या अश्लील शिवीगाळीची संजय राऊत यांची क्लीप आजही समाजमाध्यमांवर उपलब्ध आहे. अशा नाठाळ संजय राऊतांना आता महाराष्ट्रातील महिलांनीच वठणीवर आणण्याची गरज आहे, असेही चित्रा वाघ म्हणाल्या.