विशेष प्रतिनिधी
पुणे : महिला अत्याचाराची आणखी एक धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. धावत्या कारमध्ये या तरुणीसोबत चालकाने नको ते कृत्य करण्याचा प्रयत्न केला. यानंतर घाबरलेल्या महिलेने कारमधून उडी मारली. यानंतर तब्बल दोन किलोमीटर धावत जाऊन तिने खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यामुळे पुणे शहरातील महिला सुरक्षे संदर्भात प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पुण्यातील आयटी कंपनीतील महिलेला कॅब प्रवासात धक्कादायक अनुभवाला सामोरे जावे लागले. धावत्या कारमध्ये तीच्यासोबत चालकाने नको ते कृत्य करण्याचा प्रयत्न केला. भेदरलेल्या महिलेने कारमधून उडी टाकली. यानंतर तब्बल दोन किलोमीटर धावत जाऊन खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर झालेल्या अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता एका कॅब चालकाने आयटी कंपनीतील तरुणीचा विनयभंग केल्याची माहिती समोर आली आहे. प्रवासादरम्यान कॅब चालकाने आरशात पाहून विकृत चाळे केले. चालकाने अश्लील कृत्य केल्याने या तरुणीने चालत्या कॅबमधून उडी घेतली. उडी घेतल्यानंतर 2 किलोमीटर धावत जाऊन ही पीडित तरुणी पोलीस ठाण्यात दाखल झाली. खडकी पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. तसंच कॅब चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून तो उत्तर प्रदेशचा रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
ही 41 वर्षीय महिला एका आयटी कंपनीत टेक्नोलॉजी प्रोफेशनल म्हणून काम करते. पीडित महिलेने कॅब बुक केली. कल्याणीनगर येथून सुमारे साडेसातच्या सुमारास महिला पिंपळे सौदागर येथे जाण्यासाठी निघाली. गाडी संगमवाडी रोडमार्गे पाटील इस्टेट चौकाच्या दिशेने जात असताना चालकाने गाडीचा आरसा महिला दिसेल असा सेट केला. यानंतर तो चालत्या गाडीत आरशात महिलेला पाहून अश्लील कृत्य करू लागला. यानंतर महिला घाबरली आणि तिने गाडी सिग्नलजवळ येताच पळ काढला. यानंतर महिलेने दोन किलोमीटर धावत जाऊन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी महिलेकडून कॅब बुकिंगचा तपशील आणि वाहन क्रमांक घेतला. त्याआधारे कॅब मालकाचा शोध लागल्यावर चालकाला अटक करण्यात आली.