विशेष प्रतिनिधी
शिरूर : शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे रात्रीच्या वेळेस मामे भावाबरोबर गप्पा मारत बसलेल्या १९ वर्षीय परप्रांतीय युवतीवर दोघा नराधमांनी चाकूचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अत्याचार करून तिचे सोन्याची दागिने घेऊन पळून गेलेल्या दोघा नराधमांना अटक केली आहे. ( Girl gang-raped in Shirur taluka)
याप्रकरणी अमोल नारायण पोटे (वय २५ रा. संस्कृती डेव्हलपर्स पवार बिल्डींग, कारेगाव ता. शिरुर जि.पुणे मुळ रा. ढोकराई फाटा, ता. श्रीगोदा जि.अहील्यानगर) व किशोर रामभाऊ काळे (वय २९) रा संस्कृतीडेव्हलपर्स, लेन नं.१, कारेगाव ता. शिरुर जि.पुणे मुळ रा. किल्ले धारुर, ता.धारुर जि.बीड) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
पीडित तरुणी परप्रांतीय असून चारच दिवसांपूर्वी आपल्या बहिणीकडे आली होती. रात्रीच्या वेळेस मामेभावाबरोबर गप्पा मारत बसली होती. आरोपींनी तरुण-तरुणींना बळजबरीने संबंध ठेवण्यास भाग पाडले. त्याचे मोबाईल मध्ये चित्रीकरण केले. त्याचाच फायदा घेऊन मुलीवर सामूहिक अत्याचार केले.
रांजणगाव एम आय डी सी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १ मार्च रोजी रात्री दहा वाजता पीडित १९ वर्षीय तरुणी ही तिच्या २० वर्षीय मामे भावाबरोबर कारेगाव वरून राहत असलेल्या रूम कडे जात असताना घरापासून काही अंतरावर एका मोकळ्या जागेमध्ये गप्पा मारत बसली होती. रात्री अकराच्या दरम्यान दुचाकीवर दोन जण आले. त्यांनी पिडीत युवती आणि तिच्या मामे भावाला त्यांच्याकडील चाकुचा धाक दाखवुन मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने एकमेकांना चुंबन व शरीर संबध करण्यास भाग पाडले. त्याचे त्यांच्याकडील मोबाईल मध्ये फोटो व व्हिडीओ शुटींग काढुन घेतले. त्यानंतर पिडीतेच्या मामे भावाला त्यातील एकाने थोड्या अंतरावर घेऊन गेला आणि एकाने पिडीतेवर बळजबरीने बलात्कार केला. त्याच्यानंतर दुसऱ्याला बोलावुन घेऊन पहिला पिडीतेच्या मामे भावाकडे गेला. त्यानंतर त्याने आणखी लोकांना बोलावुन घेईन अशी धमकी देत पिडीतेवर बलात्कार केला.
त्यानंतर पिडीतेने घरी जावुन घडलेला सर्व प्रकार तिच्या बहीणीला सांगितला. त्यानंतर बहीणीच्या पतीने ११२ वर कॉल करुन या प्रकाराची माहीती रांजणगाव पोलीसांना दिली. पोलिसांनी तात्काळ दखल घेत पिडीतेला पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवले आणि आरोपी अमोल नारायण पोटे आणि किशोर रामभाऊ काळे या दोघांना ताब्यात घेतले.