विशेष प्रतिनिधी
मुंबई : संतोष देशमुख हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर 82 दिवसांनंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी राजीनामा दिला. ( Dhananjay Munde finally resigned)
मुख्यमंत्री म्हणाले, धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे राजीनामा दिला आहे. मी तो स्वीकारला आहे. पुढील कारवाईसाठी राज्यपालांकडे पाठविला आहे. धनंजय मुंडे यांना मुक्त करण्यात आलं आहे.ajiमस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर 82 दिवसानंतर आज मंत्रिपदाचा राजीनामा दिला.आणि संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरला हत्या करण्यात आली. यात वाल्मीक कराड मास्टरमाइंड असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. कराड हात मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. त्यामुळे अखेर मुंडेचा राजीनामा घेतला गेला.
संतोष देशमुख यांच्या हस्ते नंतर सर्व स्तरातून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. पण
मुख्यमंत्री अथवा उपमुख्यमंत्र्यांनीही मुंडे यांचा राजीनामा घेतला नव्हता. पण काल संतोष देशमुखांच्या हत्या करतानाचे काही क्रूर व्हिडीओ आणि फोटो समोर आल्यावर संपूर्ण राज्य सुन्न झाले. प्रचंड संताप व्यक्त होऊ लागला. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला. रात्री देवगिरी बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, धनंजय मुंडे यांच्यासह काही महत्वाच्या नेत्यांची बैठक झाली.
मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे अखेर आज सकाळी धनंजय मुंडे यांच्या सातपुडा बंगल्यावरून त्यांचा पीए हा राजीनामा घेऊन सागर बंगल्यावर गेला. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला असून आपण तो स्वीकारला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले
पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया देताना राजीनामा स्वागतार्ह असल्याचे सांगितले,