विशेष प्रतिनिधी
श्रीनगर; जम्मू-काश्मीर विधानसभेत विरोधकांनी माजी श्रीलंकन क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरन यांना कथुआ जिल्ह्यातील जमीन विनामूल्य देण्यात आल्याच्या वृत्तावरून सरकारला धारेवर धरले आहे.
( Former Sri Lankan cricketer Muralitharan to get free land in Jammu and Kashmir? Opposition questions in the Assembly)
मुरलीधरन यांच्या सेलोन बेव्हरेजेस या कंपनीला कथुआ येथे 25.75 एकर जमीन देण्यात आली आहे. येथे 1,600 कोटी रुपयांचा बाटलीबंद पाणी आणि अॅल्युमिनियम कॅन उत्पादन प्रकल्प उभारण्याची योजना आहे.
सीपीएम आमदार वाय. तारिगामी यांनी सरकारकडे या प्रकरणाची स्पष्टता मागितली. “ही जमीन जम्मू-काश्मीरच्या जनतेची आहे. ती कोणालाही विनामूल्य देणे हे नियमांचे उल्लंघन आहे,” असा आरोप त्यांनी केला. काँग्रेस नेते गुलाम अहमद मीर यांनीही हा गंभीर मुद्दा असल्याचे सांगून सरकारने याची चौकशी करावी, अशी मागणी केली.
दरम्यान, जम्मू-काश्मीरचे मंत्री जावेद अहमद दार यांनी विधानसभेत उत्तर देताना सांगितले की, “आमच्याकडे या प्रकरणाची कोणतीही माहिती नाही. हे महसूल विभागाशी संबंधित प्रकरण आहे. आम्ही याची चौकशी करून सत्यता पडताळून पाहू.”