पुणे : कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर बसविणाऱ्या बुलेटधारकांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. १७६८ सायलेन्सर बुलडोझर खाली चिरडण्यात आले. ( Bulldozer hits modified Bullet silencer, crushes 1768 silencers)
पुणे शहरातील बेशिस्त वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामध्ये बुलेट, दुचाकी वाहनांच्या सायलेन्सरमध्ये फेरफार करून अथवा नवीन मॉडीफाय केलेला सायलेन्सर बसवुन सार्वजनिक रस्त्यावर, रहिवासी भागात कर्कश आवाज करत भरधाव वेगाने बुलेट चालवून लोकांचे लक्ष वेधुन घेण्याचे प्रकार तरूणांमध्ये वाढत आहेत.
या कर्कश आवाजाने जेष्ठ नागरिक, महिला, शांतताप्रिय नागरिकांना त्रास होत होता. याबाबतच्या अनेक तक्रारी नागरिंकाकडुन प्राप्त झाल्याने अशा बेकायदेशीर सायलेन्सर बसविलेल्या दुचाकी वाहनांवर कठोर कारवाई करण्याबाबतच्या सूचना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिल्या होत्या. त्यानुसार, वाहतूक शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे यांनी विशेष मोहीम हाती घेतली. वाहतूक शाखेच्या सर्व विभागांना तशा सूचना देण्यात आल्या. तसेच, बुलेट सायलेन्सर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात सुरुवात करण्यात आली. यापुढे अशा प्रकारचे सायलेन्सर विक्री करणाऱ्या व बसविणाऱ्या गॅरेज मालकांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचे उपायुक्त झेंडे यांनी सांगितले.
पुणे शहर वाहतूक शाखेने मागील दोन-तीन दिवसात फेरफार केलेले सायलेन्सर वापरणाऱ्या वाहनांवर एकूण 1768 मोटर सायकल वाहनावर कारवाई करण्यात आलेली आहे नागरिकांना आवाहन करण्यात येते की अशा प्रकारच्या मोटरसायकल आपणास आढळून आल्यास पुणे शहर वाहतूक पोलिसांना माहिती कळवावी. माहिती देण्या साठी… pic.twitter.com/34xokRtVXX
— पुणे शहर वाहतूक पोलीस (@PuneCityTraffic) March 13, 2025